मुलाचा वाढदिवस निमित्त शालेय साहित्याचे वाटप चौगाव शाळेत संदीप कोळी यांचा उपक्रम चोपडा प्रतिनिधी - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा त...
मुलाचा वाढदिवस निमित्त शालेय साहित्याचे वाटप चौगाव शाळेत संदीप कोळी यांचा उपक्रम
चोपडा प्रतिनिधी -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील चौगाव येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य श्री.संदीप कोळी यांनी मुलगा चि.शिवराज याच्या वाढदिवस निमित्त चौगाव येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही,पेन,खोड रबर,पट्टी, शॉर्पनर,कंपास पेटी आदी शालेय साहित्याचे वाटप केले.वाढदिवसावर होणारा अनाठायी खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्वातून मदत करुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने संदीप कोळी यांनी वाढदिवस साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील मुख्याध्यापक श्री.संतोष सोनवणे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विदयार्थ्यांना मार्गदर्शन करून आयोजकांचे आभार मानले. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून श्री. संदिप कोळी सह गावातील युवक पंकज पवार,दिपक पाटील,गोपाल सोनवणे,महेश धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाचे सुत्र संचालन उप शिक्षिका श्रीमती राजश्री बाविस्कर यांनी केले.व संदीप कोळी तसेच आयोजकांचे यावेळी आभार मानले.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केल्याने त्यांना मनस्वी आनंद झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक विद्यानंद साठे, अनिकेत पाटील,प्रीतम सोनवणे, प्रिती भावसार, कविता गावीत, भाग्यश्री पवार आदी शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली.

No comments