हिंदु ह्रदय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान २ अंतर्गत चोपडा आगारास दुसऱ्या फेरीचे प्रादेशिक सर्वेक्षण समितीची भेट चोपडा प्...
हिंदु ह्रदय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान २ अंतर्गत चोपडा आगारास दुसऱ्या फेरीचे प्रादेशिक सर्वेक्षण समितीची भेट
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा (दि१) राज्यभर राज्य परीवहन महामंडळाकडुन राबविण्यात येत असलेल्या "हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक" अभियान २ अंतर्गत चोपडा बसस्थानकातील स्वच्छता व बसस्थानकाच्या सौंदर्यात भर घालणा-या विकासाभिमुख उपक्रमांची माहिती मूल्यांकन समितीने घेतली.
उप महाव्यवस्थापक नियंत्रण समिती क्र ३ श्रीकांत गभणे, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी किशोर आदमणे , यांच्या संयुक्त समितीने दिनांक १ ऑगस्ट रोजी चोपडा आगारास भेट देवुन संपुर्ण बसस्थानक,आगाराची पाहणी करून सर्वेक्षण केले. चोपडा आगाराचे बदलेले रुप, स्वच्छता, नीटनेटके पणामुळे" महाराष्ट्रात अव्वल असलेला चोपडा आगाराचा हेवा वाटतो व खुपच सुंदर आगार"असे गौरव उदगार काढुन यासाठी मेहनत घेणाऱ्या आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या सह चालक/ वाहक/यांत्रिक व प्रशासकीय कर्मचार्यांचे कौतुक केले.
यावेळी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले, यावेळी आगारातील अधिकारी सिध्दार्थ चंदनकर, नितीन सोनवणे, ईश्वर चौधरी,चंद्रभान रायसिंग,सागर सावंत, नरेंद्र जोशी स्थानिक समिती सदस्य पत्रकार, सुनिल पाटील,श्रीकांत नेवे, शाम जाधव,दिनकर ढिवर , महिला, पुरुष कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार भगवान नायदे यांनी मानले.
खान्देशात प्रथमच चोपडा आगारात ई बसेस दाखल होणार
चोपडा -:- राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराच्या एस टी च्या ताफ्यात तत्कालीन विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतुक अधिकारी दिलीप बंजारा यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने तसेच आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्या सततचा पाठपुरावा व अथक परिश्रमाने चोपडा आगाराच्या एस टीच्या ताफ्यात इलेक्ट्रॉनिक बसेस( ई बस) दिनांक ५ ऑगस्ट रोजी दाखल होणार असुन खान्देशात प्रथमच ई बसेस चोपडा आगारात दाखल होणार असल्याने प्रवाश्यांना आरामदायी व सुखकर प्रवास होईल.सदर बसेस जळगाव, छत्रपती संभाजी नगर,धुळे, नाशिक या मार्गावर लवकरच धावणार असुन यामुळे प्रवाशांना आरामदायी व चांगला प्रवासाचा लाभ चोपडा तालुका वासियाना होणार आहे असे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले.

No comments