मुख्य वनसंरक्षक अधिकारी वन वृत्ती धुळे यांच्या कार्यालयाससमोर सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांचे एक दिवशी लाक्षणिक उपोषण नंदुरबार प्रत...
मुख्य वनसंरक्षक अधिकारी वन वृत्ती धुळे यांच्या कार्यालयाससमोर सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांचे एक दिवशी लाक्षणिक उपोषण
नंदुरबार प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुख्य वनसंरक्षक अधिकारी वन वृत्ती धुळे यांच्या कार्यालयासमोर 15 ऑगस्ट रोजी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी एक दिवशी लाक्षणिक उपोषण केले असून याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक यांच्या अंतर्गत नंदुरबार रो.हा.यो.व नवापूर प्रादेशिक येथील तत्कालीन वनक्षेत्रपाल व विद्यमान वनक्षेत्रपाल यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत भांगडा नियत क्षेत्रात 1500 हेक्टरअतिक्रमण काढण्यासाठी कोट्यावधीस रुपये खर्च केलेत मात्र या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून बोगस प्रमाणके व बिले तयार करून पैशाचा अपहार करण्यात आला आहे सदर ती खरी माहिती मागितली असता वनक्षेत्रपाल यांनी दिशाभूल करणारी माहिती देऊन व उडवा उडवी चे पत्र देऊन निकम यांची दिशाभूल केली आहे आणि बोगस बिलांचे संपूर्ण रेकॉर्ड वन विभागाच्या कार्यालयातून गायब करण्यात आल्याचे समजले आहे तसेच नवापूर वन विभागामध्ये माती बांध दगडी बांध रोपवनाची कामे ही बऱ्याच ठिकाणी झालीच नाही तरी त्या कामांची बोगस प्रमाणके बिले तयार करून भ्रष्टाचार करण्यात आला आहे
या संपूर्ण प्रकाराची मी माहिती निकम यांनी मागितले असता ती माहिती वनक्षेत्रपाल यांचा भ्रष्टाचार उघडीस येऊ नये म्हणून देण्यास तयार नाहीत म्हणून वारंवार निकम यांनी उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्याकडे गेल्या एक वर्षापासून पाठपुरावा करीत आहे तसेच उपवनसंरक्षक अधिकारी हे एक जबाबदार अधिकारी असताना या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड तपासलेच नाहीत व माहिती देण्याचे आदेश पण केलेत पण माहिती नाही दिली उलट निकम यांना राज्य माहिती अधिकाऱ्याकडे द्वितीय अपील दाखल करा असे जाणून-बुजून उत्तरे दिलीत या भ्रष्टाचाराच्या संदर्भात निकम यांनी एक दिवसीय लक्षणिक उपोषण उपवनसंरक्षक अधिकारी नंदुरबार यांच्याकडे केले असता आज पर्यंत उपवनसंरक्षक अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केली नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी 15 ऑगस्ट रोजी मुख्य वनसंरक्षक अधिकारी वनवृत्ती धुळे यांच्याकडे एक दिवसीय लक्षणिक उपोषण केले आहे तरी मुख्य वनसंरक्षक अधिकारी हे काय निर्णय घेतात त्यांच्याकडे लक्ष लागून आहे तसेच कायदेशीर न्याय न मिळाल्यास पुढील उपोषण सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम हे वनबल प्रमुख आकाष्ट वनपोज वन विभाग नागपूर यांच्या कार्यालयासमोर करणार आहे असे सांगितले आहे

No comments