adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज / हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई

  लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज / हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ल...

 लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज / हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई

श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज / हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून  

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित दोषींवर जिल्हाभर कारवाई केली जाणार आहे.यातील एका आरोपीस नुकताच अटक करण्यात आली असुन न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.

पो. स्टे. राहुरी गुन्हा रजिस्टर नं. ९१७/ २५ कलम ६४ (१) बीएनएस सह ४,८,१२ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा यामध्ये लॉज मालक, वय २७ वर्ष रा. शिगवे नाईक याने यातील आरोपी हा पीडित मुलीस लॉज वर घेऊन गेल्यानंतर सदर इसमाने पीडित हिचे वयाची कोणतेही कागदपत्रे पाहणी ना करता रूम उपलब्ध करून दिल्याने कलम ५५ बीएनएस सह कलम १७ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम वाढ करून त्यास अटक केली आहे. न्यायालयाने देखील सदर आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याने आरोपीने गुन्ह्यास मदत केल्याचे दिसून येत आहे.

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ नुसार आरोपीला आजन्म करावासाची अर्थात त्याच्या नैसर्गिक उर्वरित आयुष्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा व द्रव्य दंड अशी शिक्षा नमूद करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीने दाखल सर्वच गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. गुन्ह्यामध्ये लॉज / हॉटेल चालक, मालक यांचा निष्काळजीपणा व अप्रत्यक्ष / प्रत्यक्ष सहभाग दिसून आले असे तपासा दरम्यान दिसून आल्यास वरील प्रमाणेच कारवाई करण्यात येणार आहे.


वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर 9561174111

No comments