तेल्हारा शहरातील प्रलंबित समस्यांसाठी स्वराज्य पक्षाचा इशारा १० सप्टेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन. अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- ...
तेल्हारा शहरातील प्रलंबित समस्यांसाठी स्वराज्य पक्षाचा इशारा
१० सप्टेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन.
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा, दि. २८ ऑगस्ट २०२५, शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या गटार साफसफाई, बंद स्ट्रीट लाइट्स, अपूर्ण रस्ते, आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे इतर प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद, तेल्हारा यांना निवेदन सादर करण्यात आले. समस्यांचे निराकरण न झाल्यास १० सप्टेंबर २०२५ पासून नगर परिषदेसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
योगेश्वर कॉलनीतील वॉटर प्लॅंटमागील खुल्या जागेत साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी अनेक तक्रारी करूनही उपाययोजना झालेल्या नाहीत, शहरातील वाढत्या चोरी, छेडछाड आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. शहरातील अनेक ठिकाणी बंद पडलेल्या स्ट्रीट लाइट्समुळे रात्रीच्या वेळी असुरक्षितता वाढली आहे. बंद लाइट्स दुरुस्त करून नवीन लाइट्स बसवाव्यात, इंदिरानगर येथील गोपाल प्रल्हाद बाबुळकर यांच्या घरापासून रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे.
तसेच स्वप्निल केशवराव शेवाळे यांच्या घराजवळील अपूर्ण नालीचे बांधकाम पूर्ण करावे,
साईनगरातील उबंरकर कॉम्प्लेक्स ते गाळेगाव कमान पर्यंत अरुंद नालीचे रुंदीकरण करावे,
गजानन नगरातील वाळके यांच्या घरापासून धान्य मार्केट ते साई मंदिरापर्यंत नवीन नालीचे बांधकाम करण्यात यावे, शहरातील शेगाव नाका आणि संत तुकाराम महाराज चौकातील रस्त्याच्या कडेला स्वच्छतागृह बांधावेत जेणेकरून परिसर स्वच्छ राहील, शहरातील फुटलेल्या नाल्या आणि अयोग्य उतारामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा येत आहे. यामुळे साचलेल्या पाण्याने गटारे तयार झाली आहेत, ज्यांचे तातडीने निराकरण करण्याची मागणी केली असुन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी स्पष्ट केले की, जर नगर परिषदेने १० सप्टेंबर २०२५ पर्यंत या समस्यांचे निराकरण केले नाही, तर शहरातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन नगर परिषदेसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातुन देण्यात आला या निवेदनावर शहरातील स्वराज्य पक्षाचे प्रतीक पात्रीकर, गणेश आमले,अक्षय भुजबुले,चेतन पिंपळकर,श्याम मोहे,आशिष पुरी,अशोक गाडे,तेजस फडके,श्रेयश जुमडे,प्रज्वल लव्हाडे,क्रितीराज देशमुख यांचेसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.नगर परिषद प्रशासन आता या मागण्यांवर किती तातडीने कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments