adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पदविकाधारक पशुवैद्यकांच्या प्रलंबित न्याय मागण्या प्रकरणी पाठपुरावा करेन -- आ. मंगेश चव्हाण. (चाळीसगाव)

  पदविकाधारक पशुवैद्यकांच्या प्रलंबित न्याय मागण्या प्रकरणी पाठपुरावा करेन -- आ. मंगेश चव्हाण. (चाळीसगाव)  प्रतिनिधि रविंद्र कोळी (संपादक -:...

 पदविकाधारक पशुवैद्यकांच्या प्रलंबित न्याय मागण्या प्रकरणी पाठपुरावा करेन -- आ. मंगेश चव्हाण. (चाळीसगाव) 


प्रतिनिधि रविंद्र कोळी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पदविका धारक पशुवैद्यकांच्या प्रलंबित मागण्या प्रकरणी आ.  मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या तत्कालीन उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ व तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी न झाल्याने या प्रकरणी मा.आ.चव्हाण यांनी लक्ष घालण्यासाठी चाळीसगाव येथे पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेचे डॉ संजय पाटील डॉ भगवान पाटील डॉ ज्ञानदेव दातीर डॉ संदीप पाटील डॉ राकेश साळुंखे डॉ कोतकर यांनी व पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचे डॉ अनिल पाटील डॉ दिपक लोखंडे डॉ प्रविण पाटील डॉ दिपक शेवाळे डॉ राकेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने संयुक्तपणे साकडे घालून विनंती केली असता आ.चव्हाण यांनी या प्रकरणी लवकरच मा सौ पंकजाताई मुंढे पशुसंवर्धन मंत्री यांच्या कडे बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासीत केले. गेल्या तिन वर्षांपूर्वी इयत्ता १२ वी विज्ञान नंतर तिन वर्ष कालावधीचा पशु चिकित्सा शास्त्र पदविका अभ्यासक्रम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय झालेला असतानाही आजतागायत सदरहू अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला नाही, दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम धारकांसाठी ३/६ महिने कालावधीचा पशु चिकित्सा शास्त्र चां पुरवणी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ १५ वर्षांपूर्वी सुचित केले असतानाही आजतागायत विद्यापीठ सदरहू अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला नाही पॅरामेडिकल सायन्स मध्ये १३४ प्रकारचे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदवीत्तर,विद्यावाचस्पती पर्यंत शिक्षणासाठी संधी उपलब्ध असताना पशुवैद्यकीय क्षेत्रात एकही सक्षम पदविका अभ्यासक्रम पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ, पशुवैद्यकीय परिषद, पशुसंवर्धन विभागाच्या कटकारस्थानामुळे उपलब्ध होऊ शकलेला नाही ही बाब पशुसंवर्धन विभागासाठी शरमेची बाब आहे. राज्यात एक लाख नव्वद हजार पदविका धारक पशुवैद्यक उपलब्ध असताना इयत्ता १० वी नंतर तिन महिन्याच्या प्रशिक्षण धारकांना कृत्रिम रेतन तंत्रज्ञ म्हणून सेवा पुरविण्यात येणार आहे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले परिणामी संबंधितांकडून चुकीच्या पद्धतीने गर्भाशय हाताळल्यास लाखो जनावरे भाकड होऊ शकतात ही शिष्टमंडळाने आमदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले या प्रकरणी निश्चितच संबधितासमवेत उच्च स्तरीय बैठक आयोजित करुन न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे श्री चव्हाण यांनी सांगितले.या प्रसंगी डॉ हेमंत कुमावत डॉ राहुल साळुंखे डॉ दत्ता जाधव, डॉ रवि कोळी डॉ सुकलाल कोळी  डॉ पंकज सैदाने आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments