उदगीर येथे लिंगायत महासंघाची जिल्हास्तरीय बैठक.. अन्यायग्रस्त लिंगायत बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार” – प्रा. सुदर्शनराव बिरादार ल...
उदगीर येथे लिंगायत महासंघाची जिल्हास्तरीय बैठक..
अन्यायग्रस्त लिंगायत बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार” – प्रा. सुदर्शनराव बिरादार
लातूर जि. प्र.(उत्तम माने)
(संपादक हेमकांत गायकवाड)
उदगीर – लिंगायत महासंघाच्या लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक दि. १० ऑगस्ट रोजी उदगीर येथील लक्ष्मीबाई प्राथमिक विद्यालयात प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
बैठकीत प्रा. सुदर्शनराव बिरादार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “लिंगायत समाजातील गरीब व अन्यायग्रस्त बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. त्यांच्या पाठीशी संघटनेची संपूर्ण ताकद उभी राहील.” त्यांनी संघटनेच्या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच संघटनेची पुढील दिशा आणि कार्ययोजना निश्चित करण्यात आली. येत्या २८ सप्टेंबर रोजी उदगीर येथे होणाऱ्या राज्यव्यापी वधू-वर मेळाव्याविषयीही त्यांनी माहिती दिली.
या बैठकीत मार्गदर्शन असलेले शि.भ.प.शिवराज नावंदे गुरुजी , अॅड. मल्लिकार्जुन करडखेलकर, सुभाष शंकरे गुरुजी, शिवानंद भुसारे, भरत करेप्पा, शांतवीर मुळे, अशोक शेटकार, शिरीष रोडगे, शंकर धुळशेट्टे, शिवकुमार होळदांडगे आदी मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. यावेळी अहमदपूर तालुकाध्यक्षपदी शिवकुमार होळदांडगे यांची निवड करण्यात आली.
यावेळी लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष करिबसवेश्वर पाटील,जिल्हा संघटक काशिनाथ मोरखंडे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत तोळमारे, सहकोषाध्यक्ष शिवदास लोहारे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पाटील, शिवानंद भुसारे, उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे, शहराध्यक्ष भिमाशंकर शेळके, शहर सरचिटणीस लक्ष्मण भालके, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे गुरुजी, शहराध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस शिवकुमार होळदांडगे, राजकुमार वडले, गणेश कारभारी, राहुल तोंडारे, बसवराज बिरादार, संगशेट्टी बिरादार, शिवकांत गंगापुरे, अनंतराव धूळशेट्टे, शरद भुरे, यशवंत पटवारी, बापूराव शेटकार, अशोक कडोळे, गंपू स्वामी, विश्वनाथ कामशेट्टे, बाबुराव शिवशेट्टी, बालाजी शिवशेट्टी, सतीश रायजी कोराळीकर, प्रवीण बिराजदार, विश्वनाथ रामशेट्टी नागठाणे यांच्यासह जिल्हा, तालुका आणि शहर कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिवशेट्टे यांनी केले, प्रास्ताविक चंद्रकांत तोळमारे यांनी केले तर आभार भिमाशंकर शेळके यांनी मानले अशी माहिती लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी दिली

No comments