खुशांत चांदणे याचे बुद्धिबळ स्पर्धेत यश भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : तालुक्यातील चिखली येथील रोजी दत्त...
खुशांत चांदणे याचे बुद्धिबळ स्पर्धेत यश
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील चिखली येथील रोजी दत्त हायस्कूल येथे 30 जुलै रोजी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात तालुक्यातील विविध शाळा सहभागी झाल्या होत्या.यामध्ये दोनगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी खुशांत ज्ञानेश्वर चांदणे ह्याला बुद्धिबळ स्पर्धेत यश प्राप्त झाले आहे व त्याची जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे. तो साकळी येथील शारदा विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक डी.एल.चांदणे सर व शिक्षिका सौ.भारती चांदणे-मरसाळे मॅडम यांचा मुलगा आहे.

No comments