रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी..अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी.. सचिन मोकळं...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी..अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली.
या अभिवादन कार्यक्रमासाठी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, ज्येष्ठ नेते विलास साठे सर, राज्य सचिव अजय साळवे, आयटी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, माजी सरपंच युवराज पाखरे, ग्रामपंचायत सदस्य शनेश्वर पवार, तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, युवक शहराध्यक्ष निखिल साळवे, रोहित कांबळे, प्रा. जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, राहुल साळवे, प्रशांत पवार, प्रविण अडबल्ले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमित काळे म्हणाले की, देशाला सामाजिक क्रांतीची दिशा दाखवण्याचे कार्य महाराष्ट्रातील महापुरुषांनी केले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिक, कष्टकरी यांच्या वेदनांना हुंकार दिली. आपल्या साहित्यातून त्यांनी श्रमिकांच्या व्यथा मांडल्याचे त्यांनी सांगितले. अजय साळवे यांनी अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून कष्टकऱ्यांच्या वेदना जगा समोर आणल्या. आजही समाजात श्रमिक-कष्टकऱ्यांना न्याय मिळत नसून, न्याय-हक्कासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने संघर्ष करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments