पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात संपन्न भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपा...
पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात संपन्न
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल नगरपरिषद संचलित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे श्रींची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. गणेश उत्सवानिमित्त विद्यालयांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने पाचवी ते बारावी मध्ये शिकत असलेले गुणवंत विद्यार्थी यांच्या हस्ते श्रींची आरती होणार असून आज बारावी विज्ञान यातील विद्यार्थी यांच्या हस्ते आज श्रींची स्थापना व आरती करण्यात आली त्याचबरोबर विद्यालयात गणेश उत्सवानिमित्त संगीतमय क्रीडा स्पर्धेचे भव्य असे आयोजन करण्यात आलेले आहे, या सर्व कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एम.के. पाटील सर, उपप्राचार्य श्री ए.एस.इंगळे सर,पर्यवेक्षक श्री व्हि.ए. काटकर सर,श्री व्हि.टी. नन्नवरे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री डी .एस. फेगडे सर, श्री पी.एन. सोनवणे सर ,श्री एन डी नेवे सर तसेच सर्व शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे सहकार्य लाभत असून गणेश उत्सवानिमित्त सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला असून विद्यालयाचे वातावरण आनंददायी आल्हादायक असे झालेले आहे.

No comments