बाल संस्कार विद्या मंदिरात श्री गणेशाची मोठ्या उत्साहात स्थापना भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : येथील बालस...
बाल संस्कार विद्या मंदिरात श्री गणेशाची मोठ्या उत्साहात स्थापना
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : येथील बालसंस्कार विद्या मंदीर व माध्यमिक विद्यालयात आज श्री गणेशाची मोठ्या उत्साहात मीरवणुक काढून स्थापना करण्यात आली . श्री अशोक प्रभाकर गडे यांच्या घरापासून मिरवणुकीस सुरवात झाली . मिरवणुकीत शाळेच्या विद्यार्थ्यानी विविध पथकां द्वारे शहराच्या मुख्य रस्त्यावरून कला गुण सादर केले.
यात झांज, लेझीम, कळशी व दांडिया या पथकांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी शहर वासीयांचे लक्ष वेधुन घेतले व कौतुकास पात्र ठरले . मिरवणुक यशस्वी होण्या साठी संस्था अध्यक्ष महेश वाणी, प्राथमिक मुख्याध्यापक सुनिल माळी, माध्यमिक मुख्याध्यापक अतुल गर्गे उत्सव प्रमुख रामदास भिरूड, ललीत चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी प्रमुख यांनी परिश्रम घेतले.


No comments