रमजीपुर येथील नाला खोलीकरणासह संरक्षक भिंती बांधण्याची मागणी नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिले निवेदन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (स...
रमजीपुर येथील नाला खोलीकरणासह संरक्षक भिंती बांधण्याची मागणी
नायब तहसीलदार संजय तायडे यांना दिले निवेदन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील रमजीपुर येथील नवयुवक तरुणांनी रावेर तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन देताना गावातील नाल्याला पावसाळ्यात सातपुडा पर्वताच्या रांगांत
अतिवृष्टी होतं असल्यामुळे रमजीपुर , खिरोदा प्र रावेर, रसलपूरच्या नदी शेजारच्या खालील वस्तीत गावातील मध्यभागातून वाहत असलेल्या नदीला पूर येतो व संपूर्ण गावांमध्ये या नदीच्या पुराचे पाणी शिरते सोबतच रसुलपुर -रमजीपुर गावांना जोडणाऱ्या उंच पुलावरून ही पुराचे पाणी वाहते त्यामुळे गावातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते सोबतच नुकसानीला ही सामोरे जावे लागते रमजीपुर गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी याच पुलावरून शाळेत जाण्यासाठी हाच मार्ग असून पूर परिस्थितीमध्ये ते नदी ओलाडून शाळेत जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांना शैक्षणिक नुकसान होते वीज विषयात मोठा प्रश्न उभा राहत आहे असंच पाणी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे गाव अंधारात काळोखात बुडते वेळप्रसंगी काही अप्रिय घटना घडली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही पावसाळ्यात या पुराचे पाण्यामुळे गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते पुराचे पाणी नागरी वस्त्या मध्ये शिरुन नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान होते त्यासाठी प्रशासनाने या नाल्यातील गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण खोलीकरण करून दोन्ही बाजूला संरक्षण भिंती बांधकाम करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे रमजीपुर येथील रहिवासी मयूर राजेंद्र कावडकर, विशाल तायडे, सुभान तडवी, अंकलेश तायडे, विक्रम तायडे, अविष्कार तायडे, इत्यादींनी केली आहे

No comments