दिव्यांग,मतिमंद मुलांच्या बाबत बच्चू भाऊ कडू यांच्याशी डॉ. योगेश महाजन यांची चर्चा अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अमळनेर -- ...
दिव्यांग,मतिमंद मुलांच्या बाबत बच्चू भाऊ कडू यांच्याशी डॉ. योगेश महाजन यांची चर्चा
अमळनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अमळनेर -- प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू भाऊ कडू अमळनेर येथे आले असता
परिश्रम मतिमंद मुला- मुलींची निवासी शाळेचे अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांनी दिव्यांग व मतिमंद विशेष मुलांच्या बाबतीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
अमळनेर येथे माजी आमदार कै.साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती समारोह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी आमदार व प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बच्चू भाऊ कडू यांना कै. साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती समारोह प्रसंगी राजकीय पुरोगामी पुरस्कार देण्यात आला.
त्यावेळी डॉ. योगेश महाजन यांनी दिव्यांग व मतिमंद विद्यार्थी यांच्या भविष्यातील अडचणी बाबत चर्चा करीत त्यांना मोफत शिक्षण, त्यांना विविध सुविधा मिळाव्या यासाठी बच्चू भाऊ यांनी शासनाकडे पाठ पुरावा करावा असे सांगितले असता यावेळी बच्चू भाऊ कडू यांनी दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधित दिव्यांगाच्या बाबतीत असलेल्या समस्या बाबत लागलीच पाठ पुरावा करीत राज्यात गेल्या वीस वर्षाहून अधिक दिव्यांग व मतिमंद निवासी मुले- मुलींच्या शाळा विना अनुदानित कार्यरत आहेत. या शाळांना अनुदान प्राप्त करून देण्यात यावे अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मारवड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, धार येथील रवि पाटील,

No comments