समाजाभिमुख विकासाची "क्रांतीज्योत" इंजि. कोमलताई सचिन तायडे (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सामाजिक सेवा, विज्ञानवादी विचार व प्रे...
समाजाभिमुख विकासाची "क्रांतीज्योत" इंजि. कोमलताई सचिन तायडे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सामाजिक सेवा, विज्ञानवादी विचार व प्रेरणादायी नेतृत्वाचा एक अद्वितीय संगम म्हणजे इंजि. कोमलताई तायडे. जनक्रांती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा इंजि. कोमलताई सचिन तायडे यांचा आज वाढदिवस. जिजाऊ-सावित्रीच्या विचारांचा वारसा जपत प्रत्यक्ष कृतीतून समाज प्रबोधन करणाऱ्या कोमलताई यांना वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कोमल ताईंचे प्राथमिक शिक्षण चांडक विद्यालय मलकापूर येथे, पॉलिटेक्निकचे शिक्षण माऊली कॉलेज जळगाव खान्देश येथे व त्यानंतर इंजिनिअरिंगचे शिक्षण माऊली कॉलेज शेगाव येथे पूर्ण झाले आहे.
त्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना मार्च २०१८ मध्ये ताईंचा विवाह वरखेड येथील इंजि. सचिन निवृत्ती तायडे (उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मलकापूर) यांच्याशी झाला. विवाहानंतर ताई मागील ७ वर्षापासून सामाजिक सेवेत कार्यरत आहेत. सामाजिक सेवेचा वारसा ताईंना घरातूनच मिळाला आहे. त्यांचे आजोबा स्वर्गीय सोपानराव पाटील हे सद् विचार सेवा समिती मलकापूरचे संस्थापक सदस्य व मराठा मंगल कार्यालयाचे कोषाध्यक्ष राहिले आहे. तसेच कोमल ताईंचे वडील श्री. गणेशराव पाटील हे संत गजानन महाराज उत्सव सेवा ट्रस्ट मलकापूरचे अध्यक्ष आहेत. कोमलताई यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, पुरस्कार प्राप्त खेळाडू व शेतकरी यांचा सन्मान सोहळा, रोजगार मेळावा, वृक्षारोपण, मतदार जनजागृती, बालसंस्कार शिबीर, रक्तदान शिबिर यांसह विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो. शेतकरी कन्या पुत्र अभ्यासिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जात वाढ होण्यासाठी आवश्यक पुस्तके व स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा आर्थिक भार कोमलताई यांनी उचलला आहे.
महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी कोमलताईंनी खामगाव येथे एस. के. स्क्वेअर इंटरप्राईजेसच्या माध्यमातून पर्यावरण पूरक नॉन ओव्हन फॅब्रिक्स कॅरि बॅगची निर्मिती प्रकल्प उभारून शेकडो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन २०२४ मध्ये कोमलताईंना युवा उद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांचे निर्मूलन करण्याकरीता ताईंनी हळदी-कुंकू कार्यक्रमामध्ये विधवा स्त्रियांना सहभागी करून घेतले. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन दृढ व्हावा यासाठी वटपौर्णिमेला ताईच्या मार्गदर्शनात असंख्य महिलांनी वृक्ष लागवड हा उपक्रम आनंदात व उत्साहात राबविला.
इंजि. कोमलताई यांना दोन मुली असून ताईंनी आपल्या लहान मुलीचे नाव 'क्रांतीज्योती' ठेवून सामाजिक समतेचा संदेश देत 'बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला आहे. कोमलताई यांचे पती इंजि सचिन तायडे यांनी बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध रस्त्यांची निर्मिती करून विभागात एक कार्यक्षम अधिकारी असा नावलौकिक मिळवला आहे. सोबतच साहेब सुद्धा सामाजिक सेवेत सक्रिय असून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत. त्यांच्या या यशात कोमलताईंचे मोलाचे योगदान असल्याने 'एका यशस्वी पुरुषामागे एक सामर्थ्य स्त्री असते' या उक्तीचा प्रत्यय यातून दिसून येतो. समर्पण व त्याग हि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये मला जाणवली कारण घर सांभाळणे व आपली कौटुंबिक जबाबदारी कोमलताई मोठ्या निष्ठेने पार पडत असतात. यामध्ये त्यांना त्यांचे सासरे श्री. निवृत्ती तायडे व सासू सौ. संगिताताई यांची भक्कम साथ राहिली आहे. शिक्षणातून समाज परिवर्तन करून 'जनसेवा' हेच ब्रीद मानून बहुजन समाजात शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची रुजवण करणाऱ्या इंजि. कोमलताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष आनंद, स्नेह व तुमच्या सर्व स्वप्नपूर्ततेने भरून जाऊ जावो.
परिंदो को मंजिल मिलेगी हमेशा,
ये फैले हुए उनके पंख बोलते है।
वही लोग रहते है खामोश अक्सर,
जमाने मे जिनके हुनर बोलते है।
श्री. संजय राहाटे सर (एम.ए. बी.एड.) म्युनसिपल हाय स्कूल, मलकापूर
मो. ९९२२२०३५११


No comments