फैजपूरच्या स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न-अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल काल्पनिक फाईल चित्र इदू पिंजारी फैजपूर-- (संपादक -:- हेमकांत गा...
फैजपूरच्या स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न-अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल
इदू पिंजारी फैजपूर--
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
येथील स्टेट बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न केल्याची घटना दि ४ च्या मध्यरात्री घडली.याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तपासचक्रे फिरविली आहेत.
दि ५ ऑगस्ट च्या रात्री अडीच ते साडेतीन वाजेच्या दरम्यान फैजपूर येथील स्टेट बँकेच्या शाखा येथे अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या दर्शनी लोखंडी गेटला साखळीला लावलेले कुलूप तोडून शटर अर्धवट उघडून तसेच शाखेतील मागील बाजूस असलेले लोखंडी शटर गेट चे कुलूप तोडून त्याचे लोखंडी शटर अर्धवट उघडून चोरीचा प्रयत्न केलेला आहे.याप्रकरणी बँकेचे शाखा प्रबंधक दिपक वसंतराव राऊत यांनी फैजपूर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रशिद तडवी यांच्यासह पोलिस करीत आहे.दरम्यान स्टेट बँकेपासून जवळच असलेल्या पटेल मसाला दुकानातून काही रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

No comments