कोल्हापुरात: हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा: सहा पीडित महिलांची सुटका: सात जणांवर ठाण्यात गुन्हा दाखल...!! सौ. संगीता इंनकर म...
कोल्हापुरात: हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा: सहा पीडित महिलांची सुटका: सात जणांवर ठाण्यात गुन्हा दाखल...!!
सौ. संगीता इंनकर मॅडम ( कोल्हापूर जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कोल्हापुरांत कळंबा (ता. करवीर ) परिसरांत एका फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचे रॅकेट उध्वस्त केले आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सहा पीडित महिलांची सुटका केली आहे. या छाप्यात रोख रक्कम पाच मोबाईल सह 90 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागांच्या पथकांने बुधवारी ही कारवाई केली आहे. वेश्याव्यवसाय अड्डा चालवणारे फतिमा विजय देसाई (वय 23) रा.राजीव गांधी वसाहत मार्केट कोल्हापूर) राहुल सुरेश लोहार (वय 23 ) रा. ठाणेकर चौक पेठ वडगांव हातकणंगले) अजय पाटील,परशुराम चवडू पाटील (वय 45) मलतवाडी ता. चंदगड विनोद माळीकर,पप्पू चव्हाण आणि फार्म हाऊसचा मालक संदीप अनिल कदम कोल्हापूर ) यांच्यावर गुन्हा करुन पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले आहे. कळंबा तर्फे ठाणे गावच्या हद्दीत स्वप्निल फार्महाऊस मध्ये बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने अनैतिक व्यापार प्रतिबंधक विभागांच्या पथकांने बुधवारी साडेदहाच्या सुमारांस छापा टाकून कारवाई करत सहा पीडित महिलांची सुटका केली आहे. पीडित महिलांना जबरदस्तीने या ठिकाणी आणून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्ती केले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या कारवाईत रोख रक्कम 3 हजार 5 मोबाईल एक दुचाकी असा 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत करवीर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला आहे.

No comments