यावल महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेत हर्षल कोळी प्रथम भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल । जळगाव जिल्हा मराठा वि...
यावल महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेत हर्षल कोळी प्रथम
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नगर परिषद मार्फत हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महाविद्यालयातील १3 विद्याथ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम क्रमांक- हर्षल समाधान कोळी( टी. वाय.बी. ए.), द्वितीय क्रमांक -हेतल वसंत माळी( एफ.वाय. बी. ए.) , तृतीय क्रमांक- हर्षला ज्ञानेश्वर धनगर ( एस.वाय. बी. ए.) यांनी मिळवला. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा विषयावर रांगोळी स्पर्धा झाली,या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रा.वैशाली कोष्ठी प्रा निर्मला पवार प्रा.रुपाली शिरसाठ यांनी कामं पाहिले. उपप्राचार्य प्रा एम.डी खैरनार, उपप्राचार्य डॉ. एच. जी भंगाळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रा. नरेंद्र पाटील प्रा.हेमंत पाटील,प्रा. अर्जुन गाढे,प्रा. पंकज महाजन यांनी यशस्वीरित्य स्पर्धा पार पडली.

No comments