adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात युवती सभेचं उद्घाटन संपन्न.

 यावल महाविद्यालयात युवती सभेचं उद्घाटन संपन्न.  यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाच...

 यावल महाविद्यालयात युवती सभेचं उद्घाटन संपन्न. 


यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कवयित्री तथा उपशिक्षिका सौ. जयश्री काळवीट यांच्या उपस्थितीत युवती सभेचं उद्घाटन संपन्न झाले. हाताला येईल ते छोटं-मोठं पण चांगलं काम व  शिक्षण घेऊन  मिळेल ती नोकरी, व्यवसाय करुन एक आदर्श जीवन जगत समाजातील आपलं दुय्यम स्थान नाकारुन आत्मनिर्भर बना असा मोलाचा सल्ला युवती सभेच्या उद्घाटक सौ. जयश्री काळवीट यांनी उद्घाटनीय भाषणातून विद्यार्थीनींना दिला. बाह्य सौंदर्यांची काळजी घेण्यापेक्षा आपल्या आंतरिक सौंदर्यांला अधिक सुंदर करा, दिसण्यापेक्षा असणं गरजेचं आहे म्हणून चांगली पुस्तकं वाचा त्यांचं तेज आपोआप तुमच्या व्यक्तीमत्वातून झळकेल असंही त्या म्हणाल्या. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी मुलींना संबोधित करताना दररोज नियमितपणे चांगल्या पुस्तकाचं एक पान जरी वाचलं तरी तुमचं जीवनमान उंचावल्या शिवाय राहणार नाही याची  ग्वाही दिली.


समाजात तसेच चारचौघात वावरताना नेहमी सतर्क रहा, स्वतःला व्यवस्थितपणे सादर करा आणि आपल्यासह आई-वडिलांचं, शिक्षकांचं, समाजाचं आणि महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल करा असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक व सुत्रसंचालन युवती सभेच्या समन्वयिका प्रा. प्रतिभा रावते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रुपाली शिरसाठ यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम डी खैरनार, उपप्राचार्य प्रा. डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. आर.डी.पवार, डॉ. एस.आर. गायकवाड, प्रा. सोनाली पाटील,प्रा. भावना बारी, प्रा. निकिता पाटील प्रा. मयुर सोनवणे, प्रा. रत्नाकर कोळी, प्रा. रामेश्वर निंबाळकर, प्रा. प्रशांत मोरे ,प्रा अरुण पावरा , डॉ. संतोष जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि बहुसंख्य विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

No comments