सातारा पोलीस अधीक्षकांना रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या कार्यक्रमासाठी निवेदन सादर..!! सौ. संगीता इंनकर-पुरीगोसावी ( सातारा जिल्हा) प्रतिनि...
सातारा पोलीस अधीक्षकांना रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या कार्यक्रमासाठी निवेदन सादर..!!
सौ. संगीता इंनकर-पुरीगोसावी ( सातारा जिल्हा) प्रतिनिधी:-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात प्रगल्भ नाव असलेल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या आगामी कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. या उपक्रमासाठी ग्रुपच्या टीमकडून आज सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. तुषार दोशी यांना प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांच्याकडूंन औपचारिक निवेदन सादर करण्यात आले.
सौ. संगीता इंनकर मॅडम यांनी सांगितले की, रोखठोक महाराष्ट्र ग्रुप हा पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्रांतील पोलीस आणि महसूल प्रशासनात चांगलीच छाप पाडत आहे. ग्रुपच्या विविध उपक्रमांमुळे अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार यांच्याकडून गेट-टुगेदर, परिचय मेळावा व समन्वयात्मक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना अनेक दिवसांपासून उपस्थित होतं होत्या.
त्याच पार्श्वभूमीवर रोखठोक महाराष्ट्र ग्रुपने आपला आगामी कार्यक्रम दिनांक ( 26 ऑक्टोबर ) रोजी सातारा पोलीस करमणूक केंद्राच्या हॉलमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व पत्रकार, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रुपच्या सहकारी बांधवांचे स्वागत रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या टीमकडूंन आदरपूर्वक करण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री. तुषार दोशी यांनी रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या कार्याची विशेष प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या. त्यांनी या कार्यक्रमाला आपल्या पातळीवर विशेष सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सौ. संगीता इंनकर मॅडम यांनी सांगितले की, हा उपक्रम पत्रकार आणि पोलीस यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी तसेच सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वेळेनुसार कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाणार आहे, जे ग्रुपच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल.
रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या या पुढाकारांमुळे सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संबंध अधिक घट्ट होतील, अशी अपेक्षा आहे. यावेळी आदरणीय पोलिस अधीक्षकांनी देखील रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे विशेष कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. आदरणीय पोलीस अधीक्षकांचे देखील आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोलाचे सहकार्य लाभणार आहे.
No comments