संत सेना महाराज यांनी धर्माची पताका समाजापुढे नेण्याचे काम केले -:- माजी नगराध्यक्ष अतुल पाटील भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- ह...
संत सेना महाराज यांनी धर्माची पताका समाजापुढे नेण्याचे काम केले -:- माजी नगराध्यक्ष अतुल पाटील
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री संत सेना महाराज हे पांडुरंगाचे भक्त होते वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका समाजापुढे रुढवण्याचे काम संत सेना महाराज यांनी केले
नाभिक समाजा हा स्वाभिमानी समाज असून कोणापुढे झुकणारा समाज नाही असे प्रतिपादन संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित एका कार्यक्रमात यावल शहराचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केले
श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची विधीवत पूजन करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले यावेळेस यावल शहरातून दिंडी मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीचे सांगता यावल येथील सार्वजनिक वाचनालयात करण्यात आली
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरस्वती विद्यामंदिर चे माजी पर्यवेक्षक शिक्षक पी एस सोनवणे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यावल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे महाजन मेडिकलचे संचालक नितीन महाजन साने गुरुजी विद्यालयाचे पर्यवेक्षक विजय नन्नवरे सर यावल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रफिक सर बाल संस्कार विद्या मंदिर चे पांडुरंग महाले सर हे होते
श्री संत सेना महाराज जयंती साजरी करण्याकरता नाभिक समाज बांधव भगिनी यांनी परिश्रम घेतले यावेळेस महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नाभिक समाजाचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केले


No comments