adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निमित्त महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची जिल्हा बैठक संपन्न.

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निमित्त महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची जिल्हा बैठक संपन्न. शेतकरी, शेतमजूर, व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आ...

 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निमित्त महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची जिल्हा बैठक संपन्न.

शेतकरी, शेतमजूर, व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा संकल्प करीत शेकडो युवकांचा स्वराज्य पक्षात प्रवेश 



अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेगाव, दि. १ ऑगस्ट २०२५: महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची बुलढाणा जिल्हा बैठक आज शेगाव येथील पांडुरंग कृपा कुणबी समाज भवन येथे यशस्वीपणे पार पडली. या बैठकीला पक्षाचे राज्य सरचिटणीस धनंजय जाधव आणि प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. येत्या काळात संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी यावेळी घेतला.बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, मेहकर आदी तालुक्यांतील पक्षाच्या जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांना सोपवण्यात आल्या. यावेळी शेकडो युवकांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव आणि प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांना सभागृहात पाठवायचे आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकीत स्वराज्य पक्ष आपल्या उमेदवारांच्या पाठीशी सर्व ताकतिने उभा राहील.”या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या न्यायासाठी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत नियोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षाला बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.यावेळी पक्षाचे नेते श्रीकांत भांडवलकर वर्धा, उज्ज्वल पाटील चोपडे, संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठलराव पाटील, गोपाल पाटील, गोपाल तायडे, यांचेसह शेकडो स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments