मोफत आरोग्य तपासणी,व औषध वाटप शिबिर तसेच महाप्रसाद वाटप संपन्न अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नांदुरा:- येथील डॉ.अमोल ...
मोफत आरोग्य तपासणी,व औषध वाटप शिबिर तसेच महाप्रसाद वाटप संपन्न
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नांदुरा:- येथील डॉ.अमोल हिंगे अध्यक्ष स्व.प्रभाकर हिंगे बहुउदेशीय संस्था(ट्रस्ट)नांदुरा व प्रभाकर हॉस्पिटल नांदुरा व तेजश्री बहुउदेशीय संस्था दहीगाव तर्फे श्रावण सोमवार निमित्त सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी दुर्गम भाग श्री काशी विश्वनाथ मंदिर लिंगा टपरी इस्लामपूर पासून ३ किमी, ता जळगाव जामोद,डॉ.अमोल हिंगे संचालक प्रभाकर हॉस्पिटल यांनी तेथे मोफत आरोग्य तपासणी त्यामध्ये रक्तदाब, बीपी तपासणी,शुगर तपासणी, हृदयाचे ठोके,ऑक्सीजन तपासणी इत्यादी व औषध वाटप शिबिराचे आयोजन केले होते, तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये जवळपास ७०० ते ८०० भाविक भक्तांनी या शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घेतला, त्याला विशेष सहकार्य श्री इस्लामपूर,वडोदा येथील नागरिक श्रीकांतभाऊ आळशी,रवीभाऊ खिरोळकर,नांदुरा येथील श्री सचिन वेरूळकार यांनी केले.

No comments