adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्री संत गजानन महाराज गुरु माऊली शेगाव पावन नगरीत मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट चा द्वितीय वर्धापन दिवस संपन्न!!

 श्री संत गजानन महाराज गुरु माऊली शेगाव पावन नगरीत मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट चा द्वितीय वर्धापन दिवस संपन्न!!  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक ...

 श्री संत गजानन महाराज गुरु माऊली शेगाव पावन नगरीत मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट चा द्वितीय वर्धापन दिवस संपन्न!! 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेगाव :- मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट मेहकर या सामाजिक संस्था वजा संघटनेचा दुसरा वर्धापन दिवस सर्व पदाधिकारी यांच्या उपस्तित पार पडला आहे.

शेगाव येथील भास्कर सभागृह येथे दिनांक ०५/०८/२०२५ रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रम साठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा मधून महिला पुरुष पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली होती.

मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे,संस्थापक कोषाध्यक्ष माननीय संगीताताई साबणकर,राष्ट्रीय महिला प्रमुख रंजनाताई चव्हाण,राष्ट्रीय प्रमुख राजेशकुमार ठाकूर, राष्ट्रीय सचिव अजय मुळतकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजाननजी इंगळे,महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रदीप पारस्कार,महाराष्ट्र संपर्क प्रमुख आरिफ खान,महाराष्ट्र सचिव रामेश्वर कापडे,महाराष्ट्र मीडिया समाधान पदमने महाराष्ट्र महिला कार्याध्यक्ष वंदनाताई म्हैस,विदर्भ प्रमुख ज्ञानेश्वर खवले,विदर्भ कार्याध्यक्ष किशोर भूतकर,विदर्भ सचिव गणेश मोरे,विदर्भ सहसचिव दत्तात्रय वाघमारे,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गुणवंत खवले,सामाजिक कार्यकर्ते माणिक कानडे,महाराष्ट्र निरीक्षक फिरदोस खान,अकोला जिल्हा अध्यक्ष भास्कर जाधव अकोला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष कैलास पोहनकर, जळगाव तालुका प्रमुख योगेश वाघ, शेगाव तालुका अध्यक्ष कैलास कावनपुरे,तसेच आदी उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते श्री.गजानन महाराज प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रम ची सुरवात झाली.


२०२४ या मागील वर्षभरात पदाधिकारी यांनी मानव हिताचे उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल पदाधिकारी यांचा सन्मानीय सत्कार घेऊन त्यांना ट्रॉफी, प्रशतीपत्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना त्यांच्या हक्काचे नियुक्ती पत्र व आयकार्ड वितरण करण्यात आले.या सन्मानीय सोहळ्याकरिता, शिर्डी,अमरावती.अकोला, बुलढाणा तसेच पुरुष,महिला पदाधिकारी यांची सुद्धा उपस्थिती दर्शविली आहे.नवनियुक्त पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट वर्धापन दिन सोहळा मोठया जल्लोष मध्ये व आनंदिमय वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय महिला प्रमुख रंजनाताई चव्हाण, महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रदीपभाऊ पारस्कार, महाराष्ट्र मीडिया प्रमुख समाधान पदमने यांनी केले आहे.शेगाव येथे वर्धापन दिन सोहळा आयोजित माननीय प्रदीपभाऊ पारस्कार, महाराष्ट्र संपर्क प्रमुख माननीय आरिफ खान यांच्या पुढाकारणे कार्यक्रम आयोजित केले होते कार्यक्रम खूप सुंदर रित्या शांततेत पार पडल्याबद्दल संचालक अध्यक्ष माननीय गजानन इंगळे साहेब यांनी आभार व्यक्त केले आहे.

No comments