चोपडा तालुक्यातील कठोरा गावात आदिवासी बांधवांना घरकुलासाठी मंजूर जागा रोखली; माजी आमदाराचा हस्तक्षेप? भीम आर्मी तर्फे निवेदनाद्वारे ग्रामस...
चोपडा तालुक्यातील कठोरा गावात आदिवासी बांधवांना घरकुलासाठी मंजूर जागा रोखली; माजी आमदाराचा हस्तक्षेप?
भीम आर्मी तर्फे निवेदनाद्वारे ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील कठोरा या गावात आदिवासी बांधवांना हक्काची घरकुल बांधण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने जागा मंजूर करण्यात आलेली आहे. मात्र त्या गावचेच माजी आमदार वारंवार हस्तक्षेप करीत असल्यामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काची मंजूर जागा अद्याप मिळालेली नाही. आदिवासी बांधवांना शासनाच्या योजनेतून घरकुल मिळावे यासाठी प्रशासनाने जमीन मंजूर केली असतानाही राजकीय दबावामुळे त्यांना न्याय मिळत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून मंजूर जागा लाभार्थ्यांना मिळवून द्यावी,अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनने केली आहे.तसेच, माजी आमदारांचा हस्तक्षेप थांबवला नाही तर कठोर आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. असा इशारा भीम आर्मी भारत एकता मिशन चोपडा तालुका अध्यक्ष मुबारक तडवी यांनी दिला आहे.
No comments