मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचे विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहि...
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचे विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३०):-श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अहील्यानगर जिल्हा यांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी व कौशल्य विकास विभाग आयुक्त साहेब यांना आज निवेदन दिले.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचे 6 ते 7 महिन्याचे मानधन अजून मिळालेले नाही.आधार पडताळणी करत असताना अनेक अडचणी येत आहेत तसेच पुनर्नियुक्ती यासंबंधी तांत्रिक अडचणी येत आहेत
प्रशिक्षणार्थी यांना 1 सप्टेंबर पासून जिओ फेनसिंग अनिवार्य केली आहे.ती रद्द करावी तसेच हभप तुकाराम बाबा यांनी 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या दरम्यान सांगली या ठिकाणी झालेल्या उपोषणादरम्यान मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय बैठक अद्याप पर्यंत झालेले नाही त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी असेही यावेळी सांगण्यात आले..
यावेळी जिल्हा प्रभारी अध्यक्ष दीपक येळे,जिल्हा सचिव प्रशांत विखे जिल्हा उपाध्यक्ष विजय दराडे,प्रिया मोकळ,माधुरी निमसे,श्रद्धा धुमाळ,अश्विनी लांबे यांच्यासह शेकडो प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
No comments