वढोदे प्र फैजपूर येथे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अवतरण दिन व लोकार्पण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ...
वढोदे प्र फैजपूर येथे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अवतरण दिन व लोकार्पण सोहळा
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर लोकसभा अंतर्गत वढोडे प्र सावदा तालुका यावल येथे सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट, फैजपूर संचलित तुलसी हेल्थ केअर सेंटर मार्फत परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्त तसेच तुलसी हेल्थ केअर केंद्राच्या नवीन वैद्यकीय विभागाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित राहिल्या व त्यांनी परमपूज्य जनार्दन हरी जी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. या वेळी जगद्गुरु सत्यंथाचार्य ज्ञानेश्वराचार्यजी महाराज (तीर्थधाम प्रेरणापीठ अरुणराबार) यांच्या हस्ते तुलसी प्राकृतिक चिकित्सालयाच्या केंद्राचे उद्घाटन मान्यवर संत व राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. परमपूज्य जनार्दन हरी जी महाराज यांच्या कृपा व संकल्पातून उभे राहिलेले तुलसी हेल्थ केअर सेंटर हे नैसर्गिक चिकित्सा, योग व आध्यात्मिक चिकित्सा यांचा समन्वय साधणारे एक अद्वितीय आरोग्यधाम ठरत आहे. येथे दर महिन्याला होणाऱ्या ५ दिवसांच्या निवासी शिबिरांतून देशभरातून येणारे साधक व रुग्ण जीवनशैलीजन्य आजार, मानसिक तणाव व जटिल व्याधींमधून मुक्ती मिळवत आहेत.नव्याने स्थापन होणाऱ्या निसर्गोपचार विभागात एकूण १२० खाटांची उपचार सुविधा, स्त्री-पुरुष स्वतंत्र विभाग, स्टीम बाथ युनिट, मृत्तिका चिकित्सा, कटि स्नान, सूर्यवाष्प स्नान चिकित्सा, अक्युप्रेशर गार्डन, शिरोधारा, जल नेती, योग चिकित्सा, पंचतत्त्व विभाग, आधुनिक आहार व्यवस्था, निवास व्यवस्था, योग-ध्यान सभागृह, तुलसी हायड्रोथेरपी मसाज, हर्बल अक्युप्रेशर गार्डन अशा आधुनिक व पारंपरिक सुविधांचा समावेश आहे. हे केंद्र केवळ उपचाराचे ठिकाण नसून मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक नवजीवनाचा प्रारंभबिंदू ठरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या केंद्राचे संचालन आचार्य सचिनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. या सोहळ्यास मान्यवर संत व राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्रद्धेय संत गोपाल चैतन्य जी महाराज (वृंदावन धाम पाल), आचार्य मानेकर बाबा शास्त्री (सावदा), योगी दत्तनाथजी महाराज (शिंदखेडा), ह.भ.प. रवींद्र जी हरणे महाराज (महाराज मुक्ताई संस्थान), परमपूज्य अनंतप्रकाशजी शास्त्री (स्वामीनारायण गुरुकुल), संत स्वरूपानंद जी महाराज, शाम चैतन्यजी महाराज (कन्नड आश्रम) यांच्यासह विविध संतांचा समावेश होता. राजकीय मान्यवरांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे,मंत्री ना. संजयजी सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, खंडवा लोकसभा खासदार ज्ञानेश्वरजी पाटील, माजी मंत्री व आमदार अर्चना चिटणीस, आमदार अमोल हरिभाऊ जावळे, आमदार चंद्रकांतजी सोनवणे, आमदार किशोरअप्पा पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नेपानगर आमदार मंजू दादू तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी केंद्राच्या कार्याचा गौरव करत भावी आरोग्य व सेवाभावी उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments