स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..तब्बल १२ ट्रक मावा सुपारी व १ ट्रक तंबाखू जप्त.. बनावट बिल्टीसह ९ कोटींचा मुद्देमाल जप्त सचिन मोकळं अ...
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई..तब्बल १२ ट्रक मावा सुपारी व १ ट्रक तंबाखू जप्त.. बनावट बिल्टीसह ९ कोटींचा मुद्देमाल जप्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२८):-कर चुकवुन आणलेली तब्बल ८ कोटी ४३ लाख ४५,०००/- रुपये किमतीची गुटखा बनविण्यासाठी लागणारी सुपारी व तंबाखु राहुरी परिसरातून जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवेध धंद्याची माहिती काढत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदाराचे मार्फतीने बातमी मिळाली की, गुटखा बनविण्यासाठी लागणारी सडलेली लाल रंगाची सुपारी, तंबाखु असे अवैधरित्या कर्नाटक या ठिकाणी आणून तेथुन गुजरात राज्यामध्ये गुटखा बनविण्यासाठी शासनाचा कर चुकवुन व बनावट बिले तयार करुन जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली,त्यानुसार पथकास पोनि.कबाडी यांनी बातमीची माहिती देवून सापळा रचुन कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या पथकाने बातमीतील हकीगती प्रमाणे चिंचोली,ता.राहुरी गावचे शिवारात होटेल महालक्ष्मी, चौधरी पैलेस येथे सापळा रचुन 13 ट्रक पकडले.पकडलेल्या ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये लाल सुपारी व तंबाखु असल्याचे दिसून आले. चालकांकडे त्यांचे ताब्यातील सुपारी व तंबाखुबाचत विचारपुस करता त्यांनी सदरची सुपारी व तंबाखू ही वाहन मालक मोहंमद अक्रम रा.कर्नाटक याची असुन त्यांचे सांगणे प्रमाणे सदरची सुपारी व तंबाखु हा गुजरात राज्यामध्ये गुटखा बनविण्यासाठी नेत असल्याचे सांगितले.त्यांचे कडे सुपारी व तंबाखू वाहतुक परवान्याबाबत बाबत विचारपुस केली असता त्यांचेकडे कोणतेही ई वे बिल मिळून आले नसून बिल्टीची पाहणी करता सदरची बिल्टी ही संगणीकृत नसुन हस्तलिखीत बनावट तयार करण्यात आल्याचे व माल पोचविण्याचा पत्ता दिल्ली असा नमुद केलेला आहे. त्यामुळे वरील ट्रक चालकांकडे मिळुन आलेली सडलेली लाल सुपारी व तंबाखु ही कर चुकवून व बनावट बिले तयार करुन आणली असल्याची प्रथमदर्शनी दिसुन येत असल्याने ६,१७,८५०००/- रुपये किमतीची २,०५,९५० किलो लाल सुपारी, १५,६०,०००/- रुपये किमतीची ७८०० किलो तंबाखु व २,१०,००,०००/- रुपये किमतीचे १३ वाहने असा एकूण ८,४३,४५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून मिळून आलेली सुपारी व तंचाखु बाबत खात्री करुन कारवाई करणेबाबत राज्य कर सहआयुक्त,वस्तु आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून पुढील कारवाई वस्तु आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांचे मार्फतीने करण्यात येत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी,पोउपनि राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे,गणेश लबडे,राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले,भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड,राहूल डोके, सतिष भवर,सुनिल मालणकर, महादेव भांड,उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.

No comments