adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

Manwatkar Home Tutorial Washim येथे साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

  Manwatkar Home Tutorial Washim येथे साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी. वाशीम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) स्थानिक व...

 Manwatkar Home Tutorial Washim येथे साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.


वाशीम प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

स्थानिक वाशिम येथील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणारा आणि  उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवणारा कोचिंग क्लास Manwatakr Home Tutorial Washim येथे साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली. या जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला सह इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. 


स्थानिक वाशिम येथील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा कोचिंग क्लास म्हणून प्रा जगदीश मानवतकर सरांचा क्लास गेल्या 13 वर्षापासून अविरत कार्यरत आहे. प्रा.जगदीश मानवतकर सर विद्यार्थ्यांच्या तृप्तगुणांना ओळखून त्यांना सतत प्रोस्ताहीत करीत असतात आणि नव नवीन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात.  याचे औचित्य साधून त्यांच्या Manwatkar Home Tutorial Washim या कोचिंग क्लासेस वर साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी  वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी या कोचिंग क्लास वरील बऱ्याच विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेऊन डॉ. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमांमध्ये वाशीम येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास कालापाड , सुप्रसिद्ध प्रा. माधवराव डोंगरदिवे सर, राजकुमार पडघान सर  यांचे मार्गदर्शन लाभले. तर पालक म्हणून सुरेश कुचेकर आणि सौ. सविता कुचेकर यांचे प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी 

प्रा. जगदीश मानवतकर सरांनी प्रबोधन करताना सांगितले की, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेले होते परंतु त्यांनी प्रचंड साहित्य लिहून समाजामध्ये जागृती केली हे विलक्षण आहे. साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण आपल्याला सतत प्रेरणा देत असते आणि समाज व्यवस्थेवर आघात करण्याचे लिखाण त्यांच्या अनेक पुस्तकातून दिसते. त्यांच्या फकीरा कादंबरीतून आपल्याला अन्यायाविरुद्ध बंड करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे आपण अन्याय विरुद्ध पेटून उठले  पाहिजे . विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये लक्ष देऊन त्यांच्या मधून प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्यासारखे लेखक व्हावे असे विचार मांडले. यावेळी या कोचिंग सेंटर वरील आरव मंजराटे, अंश राऊत, भावना शिंदे, नेहल राठोड ,आदर्श घुगे, आदित्य पवार ,ईश्वरी लोंढे, स्वरा पडघान, स्वराली मोरे, रुद्र मोरे युग अझाडे ,प्रणव बोढके , शाश्वत इंगोले, मयूर पडवाल, यश अझाडे, विवेकानंद ढोबळे या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.  यासाठी जगदीश मानवतकर सर, प्राध्यापक राहुल प्रधान सर आणि प्राध्यापक उमेश चव्हाण सर यांचे सहकार्य लाभले.

No comments