मधु ताराची पहिली रुग्णवाहिका पिंपरी चिंचवड मधील दिव्यांग व गरजू रुग्णांना मोफत सेवेसाठी उपलब्ध पुणे प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
मधु ताराची पहिली रुग्णवाहिका पिंपरी चिंचवड मधील दिव्यांग व गरजू रुग्णांना मोफत सेवेसाठी उपलब्ध
पुणे प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी संत तुकाराम नगर पिंपरी पुणे येथे मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पहिली रुग्णवाहिका दिव्यांग व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली. मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरीचे देवदूत रुग्ण वाहिका मालक श्री सनी दादा बजाज यांनी मधु ताराच्या दिव्यांग व गरजू रुग्णांच्या सेवा कार्याला समर्पित केली. मधु तारा पिंपरी चिंचवड प्रमुख श्री हसनभाई मुलाणी यांच्या विशेष नियोजन व प्रयत्नातून ही रुग्णवाहिका पिंपरी चिंचवड येथील गोरगरीब दिव्यांग व गरजू रुग्णांसाठी मोफत सेवा करण्या साठी उपलब्ध करण्यात आली. रुग्णवाहिकेचे उद्घाटन मधु तारा दिव्यांग विभागाच्या राज्य अध्यक्षा निर्मलाताई चौधरी यांचे वडील ह.भ.प आदरणीय ज्येष्ठ श्री माऊलीदादा चौधरी यांच्या हसते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले.
या वेळी मधु तारा दिव्यांग विभाग राज्य अध्यक्षा निर्मलाताई चौधरी.मधु तारा दिव्यांग आधार स्तंभ वसंतीताई जाधव.पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे. दिव्यांग श्री सिकंदभाई पठाण.पिंपरी चिंचवड उपप्रमुख डॉ आरती राऊत.पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा संगीताताई भारती.ज्येष्ठ समाजसेविका मधु तारा मार्गदर्शिका जयश्रीताई ननावरे.उपाध्यक्ष प्रतिभाताई वानखेडे.संघटिका उषाताई क्षीरसागर.उपाध्यक्ष श्री अशोकजी भारती.कार्याध्यक्ष बेबीताई शेख.युवा अध्यक्ष श्री अभिजीत भारती तसेच बचत गट महिला अध्यक्षा रिटा फर्नांडिस.कोळी महासंघाचे पुणे प्रमुख आदरणीय दादासाहेब कोळी तसेच पिंपरी पुणे येथील संत तुकाराम नगर मधील असंख्य नागरिक या लोककल्याण उपक्रमामध्ये सहभागी होते.
या वेळी मधु तारा प्रमुख यांच्या हस्ते तसेच पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे राज्य दिव्यांग विभाग अध्यक्षा निर्मलाताई चौधरी यांच्या हसते पिंपरी चिंचवड येथील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी आपल्या मधु ताराच्या कार्याचा उल्लेख मार्गदर्शन करत रुग्ण वाहिका मालक देवदूत श्री सनी बजाज सरांचे या पवित्र कार्यास समर्पित होऊन सेवा करण्यासाठी त्यांचा सत्कार करत अभिनंदन केले.
या वेळी निर्मलाताई चौधरी. श्री अनिलजी दांगडे.श्री हसनभाई मुलाणी.श्री सनी बजाज.रिटा फर्नांडिस.श्री सिकंदरभाई पठाण.वसंतीताई जाधव.यांनी मधु ताराच्या कार्याचे मार्गदर्शन उपस्थितांना केले. या वेळी असंख्य नागरिक मधु तारा सोबत जोडले गेले. पिंपरी चिंचवड प्रमुख श्री हसनभाई मुलाणी यांचे मातोश्री पिताश्री.पत्नी आणि मुलेही या पवित्र कार्यात उपस्थित होती.

No comments