"स्वयंरोजगार काळाची गरज " Supra Eats संचालक -श्रीयुत मनीष लढे मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्र...
"स्वयंरोजगार काळाची गरज " Supra Eats संचालक -श्रीयुत मनीष लढे
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीमतीजी खडसे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाअंतर्गत supra Eats agro products LLP muktainagar प्रकल्पास भेट
दिनांक 18 /8/ 2025 रोजी सदर प्रकल्पास भेटीअंती संचालक श्री मनीष लढे यांनी केळीपासून बनवल्या जाणाऱ्या विविध उत्पादनाविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी केळी वेफर्स, पॅकेट निर्मिती व त्यांची प्रक्रिया उत्पादनाचे मार्केटिंगआणि केळीच्या पावडर पासून बनवली जाणारी मिठाई व त्याकरता लागणारे साहित्य तसेच प्रमाण ,या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच या प्रकल्प उभारणीस त्यांना करावे लागलेले प्रयत्न आणि भांडवलासाठी करावी लागणा
री तरतूद या संदर्भातील संपूर्ण माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
भारतीय अर्थव्यवस्था विकसनशीलतेतून विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना ,देशात उद्योग प्रधानता वाढीस लागावी यासाठी आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगार निर्मिती ही काळाची गरज ओळखून आपल्या व परिणामी देशाच्या उज्वल भविष्याकरिता उद्योगांवर भर देणं गरजेचं आहे.
सदर प्रसंगी अर्थशास्त्र विभागाच्या 36 विद्यार्थ्यांनी या प्रकल्प भेटीस सहभाग नोंदविला यासाठी आम्हाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.ए. महाजन आणि उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, डॉ. वंदना चौधरी मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले
सदर प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत विभाग प्रमुख प्रा. पी.पी. चौधरी व प्रा.सौ एस .एम .जावळे तसेच महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. पी .पी .लढे व मनीष लढे सर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते .शेवटी विद्यार्थ्यांना संचालक व कर्मचारी यांनी केलेल्या समाधान पूर्वक मार्गदर्शनाबद्दल संपूर्ण युनिटचे आभार व्यक्त केले.

No comments