पोळा सण घरगुती पद्धतीनेच साजरा करावा - जिल्हा प्रशासनाचे आवाहन रावेर चा आठवडा बाजार गुरुवारी भरणार! रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -...
पोळा सण घरगुती पद्धतीनेच साजरा करावा - जिल्हा प्रशासनाचे आवाहन
रावेर चा आठवडा बाजार गुरुवारी भरणार!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बैल पोळा सण आणि लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर चर्मसाथरोग निर्मूलनासाठी घरगुती पद्धतीनेच साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. लम्पीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून आपापल्या घरीच बैलपूजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जनावरे एकत्र आल्यास लम्पी रोग पसरण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी पारंपरिक आनंद घरच्या घरीच साध्या व सुरक्षित पद्धतीने साजरा करावा.
“आपल्या सर्वांच्या सहभागातूनच जनावरांचे आरोग्य जपले जाईल. लम्पीचा संसर्ग रोखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पोळा हा सण घरगुती वातावरणात, सुरक्षिततेची काळजी घेऊन साजरा करावा," असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
*रावेर चा आठवडा बाजार गुरुवारी भरणार!*
ज्याअर्थी, दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी पोळा सण साजरा करण्यात येणार असून या वर्षी पोळा हा सण दिन शुक्रवारी येत असल्याने सदर दिवशी आठवडे बाजार येत आहे. सदरचा आठवडे बाजार शहरात भरतो. त्यामुळे बाजाराची गर्दी व कार्यक्रमाची गर्दी यामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण होईल सुरक्षेच्या दृष्टीने आठवडे बाजार रद्द करुन सदरचा बाजार गुरुवार दिनांक 21.08.2025 रोजी भरविण्याबाबत आदेश होणेबाबत मुख्याधिकारी रावेर नगरपरिषद, तहसीलदार, गटविकास अधिकारी रावेर यांनी उपोद्घातातील 3 चे पत्रान्वये विनंती केलेली आहे.
त्याअर्थी आयुष प्रसाद, जिल्हादंडाधिकारी जळगांव, मुंबई मार्केट अॅण्ड फेअर्स अॅक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार दिनांक 22/08/2025 रोजी रावेर येथे भरणार आठवडे बाजार रद्द करुन सदरचा आठवडे बाजार गुरुवार दिनांक 21/08/2025 रोजी भरविण्याबाबत आदेश देत आहे.
असे संबंधितांना पत्राद्वारे सुचित करण्यात आले आहे

No comments