adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जात प्रमाणपत्र काढून देतो म्हणत १८ हजार रुपयाची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने खाजगी महिलेस रंगेहात पकडले अहिल्यानगर (प्रतिनिधी):- जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका महिलेने तक्रारदारांकडून अठरा हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराच्या 19 वर्षीय मुलीच्या कुणबी जातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जून 2025 रोजी त्यांनी जिल्हा समितीकडे अर्ज केला होता मात्र प्रमाणपत्र मिळत नसल्याने फिर्यादी हा चिंतेत होता.त्याने ऑनलाइन अर्जाची चौकशी केले असता सायबर कॅफेतील कर्मचाऱ्यांनी त्याला एका महिलेचा मोबाईल नंबर दिला तक्रारदार याने आरोपी महिलेस फोन केला असता तिने प्रमाणपत्र काढून देण्याचे आश्वासन देऊन सुरुवातीला वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार याची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत विभाग अँटी करप्शनकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपी महिलेस जुना पिंपळगाव रोडवरील हॉटेल सिटी प्राईड जवळ रंगेहात पकडले.

 जात प्रमाणपत्र काढून देतो म्हणत १८ हजार रुपयाची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने खाजगी महिलेस रंगेहात पकडले   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपाद...

 जात प्रमाणपत्र काढून देतो म्हणत १८ हजार रुपयाची लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने खाजगी महिलेस रंगेहात पकडले  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.१९):- जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका महिलेने तक्रारदारांकडून अठरा हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. तक्रारदाराच्या 19 वर्षीय मुलीच्या कुणबी जातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जून 2025 रोजी त्यांनी जिल्हा समितीकडे अर्ज केला होता मात्र प्रमाणपत्र मिळत नसल्याने फिर्यादी हा चिंतेत होता.त्याने ऑनलाइन अर्जाची चौकशी केले असता सायबर कॅफेतील कर्मचाऱ्यांनी त्याला एका महिलेचा मोबाईल नंबर दिला तक्रारदार याने आरोपी महिलेस फोन केला असता तिने प्रमाणपत्र काढून देण्याचे आश्वासन देऊन सुरुवातीला वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार याची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलूचपत विभाग अँटी करप्शनकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपी महिलेस जुना पिंपळगाव रोडवरील हॉटेल सिटी प्राईड जवळ रंगेहात पकडले.

No comments