adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीरामपूरच्या बुद्धिबळ स्पर्धेत २०० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग तन्मय सर चेस अकॅडेमी व श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेचा स्तुत्य उपक्रम

  श्रीरामपूरच्या बुद्धिबळ स्पर्धेत २०० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग  तन्मय सर चेस अकॅडेमी व श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेचा स्तुत्य उप...

 श्रीरामपूरच्या बुद्धिबळ स्पर्धेत २०० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग

 तन्मय सर चेस अकॅडेमी व श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेचा स्तुत्य उपक्रम 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 तन्मय सर चेस अकॅडमी व श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यामाने खुल्या बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच पार पडल्या, स्पर्धेत मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे हे पहिले वर्ष आहे. डी.डी. काचोळे शाळेचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांच्या हस्ते व माजी उपसरपंच बाबासाहेब ढोकचौळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष भरत कुंकुलोळ, नगरसेवक दीपक चरण चव्हाण, माजी केंद्रप्रमुख किशोर निळे, केंद्रप्रमुख चंदा निळे , पीएसआय रंजन शिंदे , आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजूनाना गायकवाड , अहमदनगर येथील उद्योजक विनित छाजेड, उद्योजक प्रितेश कुंकुलोळ ,श्रीमती रुपल तन्मय निळे, मुख्यपंच गुरुजीतसिंग व आयोजक तन्मय किशोर निळे यांच्या उपस्थिती स्पर्धेचे उद्घाटन पार पडले.


        खुल्या गटात प्रथम क्रमांक निशान शिंदे , द्वितीय क्रमांक नितीन सोळके, तृतीय क्रमांक वैभव लोखंडे यांना देण्यात आला. 

१५ वर्षाखालील प्रथम क्रमांक राजवीर महाले , द्वितीय क्रमांक वरद कदम , तृतीय क्रमांक साईराज जाधव ,


१२ वर्षाखालील प्रथम क्रमांक राजवर्धन पवार, द्वितीय क्रमांक आरव सोमन, तृतीय क्रमांक संतोष स्तवन.

 

१० वर्षाखालील प्रथम क्रमांक आद्विक शिरसागर , द्वितीय क्रमांक अनय जोशी तृतीय क्रमांक अनवित ओहोळ, 


८ वर्षाखाली प्रज्ञेश सोले, द्वितीय क्रमांक श्रेया शेळके, तृतीय क्रमांक श्रेयांक सुमित त्रिभुवन यास मिळाले.

        

      या प्रसंगी आमदार हेमंत ओगले म्हणाले की, बुद्धिबळ हा साहसी खेळ असून खेळाडूंची बुद्धिमत्ता व निर्णय क्षमता याची खरी कसोटी पाहणारा  हा खेळ केवळ भारतातच नव्हे तर आज जगभरात लोकप्रिय  झाला आहे. आशियाई खेळापासून ते ऑलिंपिक पर्यंत या खेळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वेगळे स्थाने निर्माण केले आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने श्रीरामपूरमधील उद्योन्मुख खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ तन्मय किशोर निळे सरांनी निर्माण करून दिले याचा फायदा निश्चितच या खेळाडूंना होणार असून आगामी काळात आपल्या मातीतले तरुण या खेळाच्या माध्यमातून आपल्या बुद्धीकौशल्याच्या बळावर आपल्या तालुक्याचे नाव सात समुद्रापार नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच  स्पर्धेत यशस्वी झालेल्या विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

         तसेच उत्कृष्ट तालुका श्रीरामपूर-  प्रथम क्रमांक प्रेम गिरणारे, द्वितीय क्रमांक धनश्री पाटील, तृतीय क्रमांक आदिती जाधव.

      कोपरगाव तालुका - प्रथम क्रमांक वरद साळवे, द्वितीय क्रमांक चैतन्य बनसाळी, तृतीय क्रमांक आराध्या मेंढे.

       राहाता तालुका- प्रथम क्रमांक यशराज पवार, द्वितीय क्रमांक हर्षा पिपाडा.

      संगमनेर तालुका - प्रथम क्रमांक नील गायकवाड, द्वितीय क्रमांक अर्थव पवार , तृतीय क्रमांक आद्वियत हासे. वैजापूर तालुका-  प्रथम क्रमांक राजवीर भांड,

    तसेच ज्येष्ठ नागरीकांमध्ये प्रथम क्रमांक भगवान पाटील, द्वितीय क्रमांक राजेंद्र बोरुडे यास मिळाले.

      तसेच दिव्यांगमध्ये प्रथम क्रमांक अनिल साबळे यास मिळाले तसे खुल्या गटात उत्कृष्ट तालुका श्रीरामपूर तालुका प्रथम क्रमांक अरुण बोरुडे ,द्वितीय क्रमांक शरद कुर्हे.

      कोपरगाव तालुका प्रथम क्रमांक दादासाहेब सदाफळ , द्वितीय क्रमांक सागर गांधी,राहता तालुका पियुष शिंदे, द्वितीय क्रमांक सुदर्शन रोकडे. नेवासा तालुका प्रथम क्रमांक रोहित शेंडगे, द्वितीय क्रमांक किरण सरोदे.

     वैजापूर तालुका प्रथम क्रमांक सार्थक चैन्ये, द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वर दागहाळे. राहुरी तालुका प्रथम क्रमांक सुसमित बागुल, संगमनेर तालुका आशुतोष गायकवाड  यांना मिळाले. तसेच उत्कृष्ट अकॅडमीचे प्रथम क्रमांक कोपरगाव चेस क्लब ,द्वितीय क्रमांक तन्मय चेस अकॅडमी , तृतीय क्रमांक अविनाश चेस अकॅडमी, व चतुर्थ क्रमांक जिनियस चेस अकॅडमीला देण्यात आले. स्पर्धेत एकूण १२५ बक्षीसे ठेवण्यात आली होती व २०० पेक्षा जास्त स्पर्धाकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

      बक्षीस वितरण आमदार हेमंत ओगले,काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस करण ससाणे ,सरपंच प्रेमचंद कुंकुलोळ, चांगदेव ढोकचोळे, भरत कुंकुलोळ , बाबा दिघे , सुभाष गायकवाड, माजी केंद्रप्रमुख किशोर निळे, माजी नगरसेवक दीपक चरण चव्हाण, विनित भरत कुकलोळ, आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पाडला.


       स्पर्धेसाठी तन्मय किशोर निळे, शुभम गोळेसर, प्रसाद हजारे , सुहास धनेधर, सुमित अग्रवाल, नितीन सोळंके, सागर गांधी ,किरण सरोदे, सागर खैरनार ,अरुण बोरुडे , संदीप कदम , आशुतोष गायकवाड, शाकीर शेख, बाबासाहेब भोसले, तुलसीदास हतागळे, संदीप गिरनारे, सचिन फाजगे , कल्याणी निळे आदित्य सहकार्य लाभले.  कार्यक्रमात स्वागत विनीत कुंकूलोळ यांनी केले तर आभार गुरुजीत सिंग गुड्डू यांनी मानले. 

-------------------------------------------------

श्रीरामपूर- तन्मय सर चेस अकॅडमी व श्रीरामपूर तालुका बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यामानाने खुल्या बुद्धिबळ स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रसंगी आमदार हेमंत ओगले, काँग्रेस पक्षाचे

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस करण ससाणे ,सरपंच प्रेमचंद कुंकुलोळ, चांगदेव ढोकचोळे, भरत कुंकुलोळ , बाबा दिघे ,सुभाष गायकवाड, माजी केंद्रप्रमुख किशोर निळे, तन्मय किशोर निळे , माजी नगरसेवक दिपक चरण चव्हाण आदी.

-------------------------------------------------

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments