adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रकाश विद्यालय हिरक महोत्सव! प्रकाशाच्या वाटेवर व्याख्यानमाला पुष्प2 अंतर्गत जगण्याइतके मरणालाही सुंदर करते - कवीवर्य श्री. वा. ना. आंधळे

 प्रकाश विद्यालय हिरक महोत्सव! प्रकाशाच्या वाटेवर व्याख्यानमाला पुष्प2 अंतर्गत जगण्याइतके मरणालाही सुंदर करते - कवीवर्य श्री. वा. ना. आंधळे ...

 प्रकाश विद्यालय हिरक महोत्सव!

प्रकाशाच्या वाटेवर व्याख्यानमाला पुष्प2 अंतर्गत जगण्याइतके मरणालाही सुंदर करते - कवीवर्य श्री. वा. ना. आंधळे 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील प्रकाश विद्यालय व जुनि.कॉलेज येथे संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त प्रकाशाच्या वाटेवर व्याख्यानमाला पुष्प2 अंतर्गत जगण्याइतके मरणालाही सुंदर करते : कविता या विषयावर खानदेशातील उत्कृष्ट साहित्यिक प्राध्यापक , कवीवर्य श्री. वा. ना. आंधळे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री .पि.टी महाजन सर यांनी भूषविले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री श्रावण सिताराम महाजन साहेब ,संस्थेचे चेअरमन श्री डी के महाजन साहेब संस्थेचे सचिव श्री किशोर जगन्नाथ पाटील साहेब ,संस्थेचे सहसचिव श्री पी एल महाजन साहेब ,विद्यालयातील मुख्याध्यापक श्री व्ही एस महाजन सर ,पर्यवेक्षक श्री आर पी बडगुजर सर ,वक्ते श्री वा .ना .आंधळे सर यांनी मिळून प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री .आर पी.बडगुजर सर यांनी केले वक्त्यांचा परिचय श्री. जे .आर .पाटील सर यांनी दिला. आपल्या अष्टपैलू शैलीतून श्री.वा.ना आंधळे सर यांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले . कवितेचे महत्त्व सांगताना सरांनी विद्यार्थ्यांना जीवन हसत खेळत कसं जगावे याचे मार्गदर्शन केले आणि अभ्यासाचे महत्त्वही पटवून दिले .

संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री .डी. के .महाजन साहेब आणि अध्यक्ष श्री .पी .टी .महाजन साहेब यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षक श्री .यु .जी .महाजन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ भावना पाटील मॅडम यांनी केले . विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा मनमुराद आनंद घेतला.

No comments