ग्रामीण भागातील योजना दुत बनले नामधारी? शासकीय योजनेचा लाभार्थ्यांची भटकंती भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल ...
ग्रामीण भागातील योजना दुत बनले नामधारी?
शासकीय योजनेचा लाभार्थ्यांची भटकंती
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : सरकारी योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना दुत नियुक्त केले आहे मात्र ते फक्त नामधारी दिसून येत आहे असे चित्र ग्रामीण भागात आजही कायम आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या असून त्या लाभ मिळावा म्हणून लाभार्थी ग्राम पंचायत, तलाठी कार्यालयात भटकंती करीत आहेत अनेक ठिकाणी कादगपत्रे जुळवा जुळव करावी लागते मात्र माहितीच्या अभावा मुळे खरे लाभार्थी वंचित राहात आहे
सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावीपणे पोहचवणे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सरकार आणि नागरीक यांचात सुलभ संवाद निर्माण करणे व लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या अनेक योजना राबविल्या जातात त्या पोहचविण्यासाठी २०२४ पासुन प्रत्येक ग्राम पंचायत कार्यालयात योजना दुत नियुक्त करण्यात आले आहे ते मात्र नामधारी असल्याचे दिसून येत आहे. गाव पातळीवरील अनेक योजना राबविल्या जातात त्यासाठी ग्राम पंचायत मध्ये नियुक्ती करण्यात आलेल्या योजना दुत महिन्या भरात कीमान दोन तीन दिवस दिसून येत आहे नंतर दिसून येत नाही त्यामुळे लाभार्थ्याना तहसिल कार्यालय, पंचायत समिती मध्ये दाखल करण्यात आलेले योजनांची माहिती साठी संपर्क साधावा लागतो त्यामुळे योजना दुत नियुक्त असुनही नसल्या सारखे आहे
No comments