adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांची वाढलेलीफी तात्काळ कमी करावी अन्यथा 29 सप्टेंबर रोजी राज्य भीक मांगो आंदोलन करण्यात येईल.... जगदिश मानवतकर

  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांची वाढलेलीफी तात्काळ कमी करावी  अन्यथा 29 सप्टेंबर रोजी राज्य भीक मांगो आंदोलन करण्यात येई...

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विद्यार्थ्यांची वाढलेलीफी तात्काळ कमी करावी  अन्यथा 29 सप्टेंबर रोजी राज्य भीक मांगो आंदोलन करण्यात येईल.... जगदिश मानवतकर  


वाशिम प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वाशिम :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी एलएल.बी व एलएल.एम यांच्या परीक्षेत अचानकपणे वाढ केल्यामुळे परीक्षा फी कमी करावी व विद्यापीठाच्या जाचक अटी शिथिल करण्याबाबत विद्यार्थी एकता जिंदाबाद कृती समिती वाशिम तर्फे  जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले . 


संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी यांनी LL.B व LL.M यांची परीक्षा फी तसेच सर्व पदवी आणि पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेची फी अचानकपणे वाढ केली आहे. उदाहरण घेतलं तर एल.एल.बी ची  2025 ची उन्हाळी परीक्षा फी रु. 550 रुपये होती. परंतु आत्ताची हिवाळी 2025 ची परीक्षा फी अचानकपणे वाढवून ती रू. 975 करण्यात आली आहे. ही परीक्षा फी अचानकपणे वाटण्याचे कारण काय होते असा प्रश्न बऱ्याच गरीब विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पडला आहे. म्हणून आपण मुख्यमंत्री या नात्याने या गोष्टीकडे लक्ष द्यावे . जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आर्थिकरित्या कमकुवत आहेत तसेच जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपलं शिक्षण हलाखीच्या परिस्थितीत करत आहेत अशा विद्यार्थ्यांना न्याय देऊन ही परीक्षा फी तात्काळ कमी करावी. त्याचप्रमाणे बऱ्याच पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या रिचेकिंग करण्याकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने फक्त एका वेळेस दोनच विषयाचे रिचेकिंग करता येते ही जाचकट ठेवली आहे .  जर एखाद्या विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थिनीचा एखादा अभ्यासक्रमाचा दोन पेक्षा जास्त  विषय बॅक राहिले असतील  तर त्या  विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला दोन पेक्षा जास्त विषय रिचेकिंग करिता पाठवण्याची सोय करावी आणि वरील  जाचक अट शितल करावी. उदाहरणार्थ एलएलबी अभ्यासक्रमाच्या कोणत्याही सेमिस्टरचे दोन पेक्षा जास्त विषय बॅक राहिले असतील तर आपल्याला फक्त दोनच विषयाचे पेपर हे  रीचेकिंग करीता पाठविता येतात. तरी आपण ही जाचकट शिथिल करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांनी केली आहे.  त्याचप्रमाणे जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला बॅक राहिलेला एका विषयाचे रीचेकिंग करिता अर्ज करायचा असेल तर त्याला प्रत्येकी रू.200 रुपये लागतात . परंतु जर बॅक राहिलेल्या सर्व  विषयाची परीक्षा द्यायची असेल जवळपास 600 रू  लागतात ( मागील 2025 च्या उन्हाळी परीक्षेच्या नियमानुसार ) . तर अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून आपण तात्काळ  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला यावरील प्रकरणाविषयी विचारून परीक्षा फी कमी करावी, जाचक अटी शिथिल कराव्या तसेच विद्यार्थ्यांना न्याय द्यावा . वरील मागण्या या ह्या 27 सप्टेंबर पर्यंत मान्य न झाल्यास 29 सप्टेंबर तारखेला अमरावती विभागाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी कमी करण्याकरिता भीक मांगो आंदोलन छेडण्यात येईल . असा इशारा जगदीश मानवतकर यांनी निवेदनद्वारे केला आहे . यावेळी विद्यार्थी एकता जिंदाबाद कृती समिती चे राज्य समन्वयक जगदीश मानवतकर , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान , मराठा समाज नेते अरुण शेळके पाटील ,वाशिम जिल्हा समन्वयक नारायण पाबळे सर, जिल्हा उपसमन्वयक सागर अवचार, जिल्हा संघटक रामदास कालापाड , महादेव आवारे ,अरुण कुरवाडे , इबादुल्हा खान यांच्या सह सर्व LL.B,LL.M चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती. तरी या निवेदनाच्या प्रतिनिधी उपमुख्यमंत्री ,शिक्षण मंत्री, कुलगुरू , प्राचार्य लॉ कॉलेज वाशिम यांना पाठविण्यात आल्या.

No comments