adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना जिल्हाध्यक्ष पदी मुबारक उर्फ राजू अलीखाँ तडवी

 आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना जिल्हाध्यक्ष पदी मुबारक उर्फ राजू अलीखाँ तडवी    इदू पिंजारी फैजपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आ...

 आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना जिल्हाध्यक्ष पदी मुबारक उर्फ राजू अलीखाँ तडवी   


इदू पिंजारी फैजपूर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना महाराष्ट्र राज्य या आदिवासी संघटनेच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार मुबारक उर्फ राजू अलीखाँ तडवी यांची सर्वानुमते संस्थापक अध्यक्ष राजू बिऱ्हाम तडवी प्रदेश अध्यक्ष कामील नामदार तडवी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष इरफान तडवी सर अनिल तडवी सर आदिच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या 

आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना सलग २८वर्षापासून संपूर्ण आदिवासी समाजाच्या हक्क व अधिकारांसाठी लढा देत आहे समाजातील अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी तसेच वेळप्रसंगी उपोषण मोर्चा, आंदोलनाद्वारे हक्क अधिकार मिळविण्यासाठी सदैव कार्यरत आहे सामाजिक चळवळ उभी करणे आदिवासी संस्कृती प्रचार प्रसार जतन संवर्धन प्रदर्शन करणे आदिवासी समाज बांधवांचा लग्न कार्यासाठी होणारा अवाजवी खर्च टाळता यावा व आदिवासी समाज बांधवांच्या मेहनतीने कमविवेल्या पैशांची बचत व्हावी व त्यांचा आर्थिक पाया भक्कम व्हावा या उदात्त हेतूने आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना सलग २८वर्षापासून निःशुल्क दानशूर दातृत्वाच्या मदतीने सामाजिक सामुहिक विवाह सोहळा अविरत चालविला आहे व तो पुढेही कायम सुरू ठेवण्याचा संघटनेचा मानस आहे आसेमं सामुहिक विवाह सोहळ्यात आजतागायत दिड हजारांचे वर शुभमंगल विवाह पार पडले आहेत आसेम़ं आदिवासी सेवा मंडळ संघटना आदिवासी समाजातील अनेक विविध विषय प्रश्नांसाठी लढत आहे व आसेमं संघटना सदैव आदिवासींच्या हक्क अधिकारांसाठी कार्यरत असणार असल्याचे जिल्हाध्यक्ष मुबारक तडवी यांनी सांगितले

No comments