गारबर्डी धरण ओव्हरफ्लो! हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले,१६ हजार २५७ क्यूसेकने विसर्ग पाण्याच्या पातळीत वाढ रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (सं...
गारबर्डी धरण ओव्हरफ्लो!
हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले,१६ हजार २५७ क्यूसेकने विसर्ग पाण्याच्या पातळीत वाढ
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस झाल्यानंतर हतनूर धरणाचे ४१ पैकी १८ दरवाजे बुधवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पूर्णपणे उघडण्यात आले. यामुळे सुमारे एक लाख १६ हजार २५७ क्यूसेकने विसर्ग होत असून तापी नदी खळबळून वाहत असल्याने नदीला पूर आला असून तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी पुन्हा पाण्याची आवक वाढल्याचे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने हतनूरचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्याचा निर्णय घेतला. हतनूरचा विसर्ग वाढल्यानंतर शेळगाव बॅरेजचे सहा दरवाजे दीड मीटरने आणि तीन दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. सुकी नदीवरील गारबर्डी धरण ओव्हरफ्लो झाले असून सुकी नदी पात्र दुथळी पाणी वाहत आहे रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे

No comments