लोकसंख्येच्या संख्यात्मतेपेक्षा गुणात्मक महत्वाची - डॉ. नारायणकर मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर...
लोकसंख्येच्या संख्यात्मतेपेक्षा गुणात्मक महत्वाची - डॉ. नारायणकर
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालयात भूगोल विभागाद्वारे राज्यस्तरीय वेबिनार 'लोकसंख्या- एक साधन संपत्ती' या विषयावर ऑनलाईन संपन्न झाला. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते तर मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. दीपक नारायणकर सोशल महाविद्यालय, सोलापूर यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. नारायणकर यांनी भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही जरी चिंतेची गोष्ट असली तरी जगात जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया व रशिया यासारखे देश लोकसंख्या वाढविण्यावर भर देत आहेत कारण त्या देशातील नियोजनकार लोकसंख्येमध्ये गुणात्मता निर्माण करत असतात त्यामुळे देशाचा आर्थिक विकास साधून दरडोई उत्पन्न वाढविण्यास मदत होत असते. परंतु भारतासारख्या विकसनशील देशात लोकसंख्या ही जगात दुसऱ्या क्रमांकाचे असून ती संख्यात्मक आहे, खरंतर लोकसंख्या ही एक साधनसंपत्ती आहे, संख्यात्मक लोकसंख्येमध्ये गुणात्मकता निर्माण केल्यास साधनसंपत्ती बनेल, येणाऱ्या कालखंडात भारत याच लोकसंख्येच्या गुणात्मकतेवर विकसित देश म्हणून जगात नावारूपास येईल अशी आशा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन यांनी आपल्या देशाची लोकसंख्या ही समस्या म्हणून न पाहता ती भांडवल म्हणून आपण पाहिले पाहिजे आणि यातूनच उद्याचा 'स्किल इंडिया - स्टार्टअप इंडिया' निर्माण होईल असे प्रतिपादन केले. या वेबिनारचे संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे व डॉ. वंदना चौधरी यांनी केले या राज्यस्तरीय वेबिनारसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधक यांची विशेष उपस्थिती ऑनलाइन लाभली होती. या वेबिनारचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा. संजय पाटील तर सूत्रसंचालन प्रा. विजय डांगे आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अतुल बढे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. राजन खेडकर यांनी परिश्रम घेतले.

No comments