जळगावात कोळी समाज प्रतिष्ठानतर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.. शेकडों रूग्णांची मोफत तपासणी - बहुउद्देशीय संस्थेचा स्त्युत्य उपक्रम. ...
जळगावात कोळी समाज प्रतिष्ठानतर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..
शेकडों रूग्णांची मोफत तपासणी - बहुउद्देशीय संस्थेचा स्त्युत्य उपक्रम.
जळगाव (प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव :- येथील कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्था व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कांचननगरातील शहरी आरोग्य वर्धीनी केंद्र (प्ले सेंटर) येथे सर्व प्रकारचे आजारांवरील रूग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे आयोजन सामा. कार्यकर्ते अक्षयकुमार सोनवणे यांनी केले होते. अध्यक्षस्थानी जळगावचे आमदार सुरेश भोळे (उर्फ राजूमामा भोळे) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे, भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, चोपडा ग.स.चे शाखाधिकारी जगन्नाथ बाविस्कर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र कोळी, ज्येष्ठ सल्लागार गोकुळ सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रतिष्ठानतर्फे उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जगन्नाथ बाविस्कर यांनी केले. मान्यवरांनी आपल्या भाषणात शिबिराचे आयोजक अक्षयकुमार सोनवणे यांच्या कार्याबदल गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी सर्वप्रकारच्या शेकडों रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी गोदावरी फाउंडेशनचे वैद्यकीय अधिकारी व नर्सस्टाफ यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी संजय बाविस्कर, अक्षय सोनवणे, अनिल कोळी, आनंद सपकाळे, सुधाकर बाविस्कर, दीपक कोळी, गणेश बाविस्कर, शिवाजी सूर्यवंशी, रतन बिऱ्हाडे, फौजी सतीष कोळी, निश्चलदास साळुंखे, सतीश कोळी, जयकुमार सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन अक्षयकुमार सोनवणे यांनी केले.

No comments