adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत इंजिनिअर्स डे उत्साहात साजरा

 श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत इंजिनिअर्स डे उत्साहात साजरा  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चो...

 श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत इंजिनिअर्स डे उत्साहात साजरा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : दिनांक:-१५/०९/२०२५ वार सोमवार रोजी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन), चोपडा येथे अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चोपडा नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंते मा.श्री.डिगंबर सुदामराव वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अभियंता या व्यवसायाचे महत्त्व, जबाबदाऱ्या आणि समाजातील योगदान याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी चोपडा नगरपरिषदेचे अभियंता मा. श्री. सचिन देसले यांनीही विशेष उपस्थिती दर्शवली .यावेळी स्थापत्य विभागाचे वरिष्ठ व्याख्याते प्रा.एस.इ.शिसोदे यांनी कवितेतून विद्यार्थ्यांना इंजिनीरिंग चे महत्व समजवले. प्रसंगी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रा.व्ही.एन. बोरसे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना यशस्वी अभियंता होण्यासाठी आवश्यक कष्ट, शिस्त, तांत्रिक ज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांचा कानमंत्र दिला.कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विभाग प्रमुखांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अॅड. संदीप सुरेश पाटील व सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्युत विभागाचे प्रमुख प्रा. कमलेश एस. पाटील यांनी केले.

No comments