जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी राहुल बडगुजर यांची निवड अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अमळनेर: अखिल भारतीय बडगुजर समाज नवोदय युवा...
जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी राहुल बडगुजर यांची निवड
अमळनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अमळनेर: अखिल भारतीय बडगुजर समाज नवोदय युवा मंचातर्फे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवड केली जात आहे. याच उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर शहरातून राहुल अशोक बडगुजर यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज नवोदय युवा मंचामार्फत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांना अधिक गती देण्यासाठी तालुका आणि जिल्हा समित्या स्थापन केल्या जात आहेत.
या नियुक्तीपत्रावर राष्ट्रीय कार्याध्यक्ष केशव बडगुजर आणि संस्थापक अध्यक्ष अमित बडगुजर यांच्या आदेशानुसार ही निवड झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यांच्या निवडीमुळे समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments