adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक, बापू राठोड फरार लातूर जिल्ह्यात खळबळ..

  मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक,  बापू राठोड फरार लातूर जिल्ह्यात खळबळ..  लातूर जि. प्र. (उत्तम मान...

 मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक, 

बापू राठोड फरार लातूर जिल्ह्यात खळबळ.. 



लातूर जि. प्र. (उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांची तयार केली बनावट कागदपत्रे!

उदगीर :- बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.

याबाबत अधिक माहिती अशी की मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांची तयार केली बनावट कागदपत्रे!

१४ लाख ४० हजार ४४० रुपयांची केली फसवणूक

नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरून प्राचार्य, संस्थाचालका विरुद्ध गुन्हा

अधिकाऱ्यांच्याही बनावट सह्या…

१४ लाख ४० हजार ४४० रुपयांची केली फसवणूक

उदगीर तालुक्यातील गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ कौळखेड व्दारा संचलित राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालय उदगीर या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य तथा तत्कालीन संस्थेचे अध्यक्षांंनी खोटे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र बनावट तयार करून मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे १४ लाख ४० हजार ४४० रुपयांची शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी शनिवारी (२१ सप्टेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात संस्थाचालक विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामूळे उदगीर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरून प्राचार्य, संस्थाचालका विरुद्ध गुन्हा

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सन २०१३ -१४ व सन २०१४ -१५ या कालावधीत गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ कौळखेड व्दारा संचलित उदगीर येथील राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य व संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र बनावट कागदपत्राधारे तयार केले व ते खरे आहेत, असे भासवून त्याचा वापर केला. त्यावर शासनाचे अर्थात् तहसीलचे बनावट शिक्के बिनधास्तपणे वापरले. या कागदपत्राच्या आधारावर त्यांनी ७० विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरला व स्कॉलरशिपही मिळविली. यातून शासनाची १४ लाख ४० हजार ४४० रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी नायब तहसीलदार उदगीर विलास नामदेव सोनवणे यांनी फिर्याद दिली. यावरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंवि प्रमाणे  बापुराव शंकरराव राठोड (रा.उदगीर ता.उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान पोलिसात गुन्हा नोंद झाल्याचे कळतात बापूराव राठोड फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकत्ते हे करीत आहेत.

अधिकाऱ्यांच्याही बनावट सह्या…

जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र इतकेच नव्हे तर नॉन क्रिमिलियर सारखे महत्त्वाचे प्रमाणपत्र अगदी सहजरित्या बोगस कागदपत्राच्या आधारावर यांनी तयार केले. अर्थात महसूल प्रशासनातील तहसीलदारांसारख्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याचा बोगस शिक्का, बोगस सही यांचा वापर करण्यात आला. इतकेच नव्हे, तर उपविभागीय अधिकाऱ्यांच्याही बोगस सह्या व सिक्के तयार करून नॉन क्रिमीलेअर सारखी प्रमाणपत्रे काढण्यात आली.

उदगीर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून नावारूपाला येत असलेल्या संस्थेत असा बोगस प्रकार करण्यात आला. शिवाय उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यासारख्या अधिकाऱ्यांच्या सह्या व शिक्के बिनदिक्कत करून सरकारची दिशाभूल केली, फसवणूक केली. दस्तूर खुर्द नायब तहसीलदारांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल होतात फरार होण्याची वेळ  बापूराव राठोड वर आली.

No comments