adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाल वृंदावन धाम आश्रमात भगवान श्री रामदेवजी बाबा जन्मोत्सव साजरा

 पाल वृंदावन धाम आश्रमात भगवान श्री रामदेवजी बाबा जन्मोत्सव साजरा  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  गोरगरिबांचे लो...

 पाल वृंदावन धाम आश्रमात भगवान श्री रामदेवजी बाबा जन्मोत्सव साजरा 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 गोरगरिबांचे लोकदेवता रुणीचा सरकार भगवान श्री रामदेवजी बाबा यांच्या साडेसहाशेवा जन्मोत्सव परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम वृंदावन धाम पाल येथे साजरा करण्यात आले.


  कलयुगात राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात पोकरण येथे अवतरलेले द्वारिका धीश तवरवंशी भगवान श्री रामदेव जी बाबा यांनी एकात्मतेचे संदेश देऊन भोळ्या भक्तांना अंधश्रद्धा व विविध परचा देऊन दर्शन दिले. जगभरात पूजीले जाणारे लोकदेवता भगवान श्री रामदेवजी बाबा यांची रुणीचा, राजस्थान येथे संजीवनी समाधी असून त्यानिमित्तानी ठिकठिकाणी भाद्रपद चंद्रदर्शन पासून तर दशमी पर्यंत जन्मोत्सव साजरा करण्यात येते असेच पाल येथे सालाबादाप्रमाणे यंदाही संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धाम येथे दशमी निमित्त येथील विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात जम्मा जागरण, शोभायात्रा व भंडाऱ्याचे भव्य आयोजन दि 02 सप्टेंबर रोजी करण्यात आले. या वेळी श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी आपल्या रसाळ अमृत वाणीतून उपस्थित हजारो चैतन्य साधकांना भगवान श्री रामदेवजी बाबा यांच्या लीला व भक्तांना नवसाला पावणारे दैवत बाबा रामदेवजी यांची शिकवण व परम पूज्य बापुजींना घडलेले साक्षात दर्शन आणि अनुभव यांचे विस्तृत सत्यता आपल्या सत्संगातून केले. तसेच श्री हरिधाम मंदिरात विराजित भगवान श्री रामदेवजी बाबा यांनी महाआरती व पाल येथील श्री मदन महाराज, भरत पवार, शत्रुघ्न पवार यांच्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. 


No comments