यावल महाविद्यालयात इतिहास मंडळाचे उद्घाटन संपन्न. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावल कला वाणिज्य विज्ञान महाविद्य...
यावल महाविद्यालयात इतिहास मंडळाचे उद्घाटन संपन्न.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल येथे प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली वरणगाव येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर अनिल पाटील यांच्या हस्ते इतिहास विभागाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉक्टर संतोष जाधव यांनी केले तर टी वाय बी ए ची विद्यार्थिनी. दीक्षा पंडित ने सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल पाटील यांनी इतिहासाचे महत्त्व या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. मानवी जीवनात इतिहासाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे माणूस जन्मापासून तो मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर जीवन जगत असतो. जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही या वाक्यप्रमाने. इतिहासा भविष्यकाळाचा नंदादीप असतो वर्तमान आणि भविष्य काळातील घटनांचा अभ्यास या ज्ञान शाखेमध्ये केला जातो. मानवाने कशी प्रगती केली याचा सखोल अभ्यास इतिहास या ज्ञान शाखेमध्ये केला जातो असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य प्राध्यापक एमडी खैरनार सर यांनी इतिहासाचे महत्त्व सांगताना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतिहास हा विषय खूप महत्त्वाचा आहे एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा करताना हा विषय डाउनलोड चालत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतिहासाची गोडी निर्माण करून इतिहास अध्ययन केले पाहिजे असे सांगितले. आपल्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरी विचाराची परंपरा लाभली आहे या महापुरुषांनी अनेक महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या त्या मानवी जीवनाशी निगडित आहेत म्हणून महापुरुष आपण वाचले पाहिजे हे आवर्जून उपप्राचार्य यांनी सांगितले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी उपस्थित होत्या तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक सिटी वसावे सर यांनी केले.

No comments