adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

युवकांनो सोशल मीडियावरील एका चुकीमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल सावधानी बाळगा - अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक

 युवकांनो सोशल मीडियावरील एका चुकीमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल सावधानी बाळगा - अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक   रावेर प्रतिनिधी मुबारक त...

 युवकांनो सोशल मीडियावरील एका चुकीमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होईल सावधानी बाळगा - अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर पोलिस स्टेशनच्या वतीने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी युवकांना

सोशल मीडियावरील एक चुकीची पोस्टही कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करू शकते.व एकदा गुन्हा दाखल झाला म्हणजे संपुर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते त्यासाठी युवकांनी सोशल मीडिया चा वापर करतांना सावधानता बाळगावी जबाबदारीने वागावे सोबतच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे 

असे दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर  कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेम्हणून  शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक रावेर पोलीस स्टेशनचे वतीने आयोजित करण्यात आली होती घेण्यात आली. 

रावेर येथील कमलाबाई गर्ल्स हायस्कूल जिमखाना हॉलमध्ये ही बैठक पार पडली. आगामी दुर्गा उत्सवाचा शांततेत व उत्साहात साजरा होण्यासाठी पोलिस आणि नागरिकांनी एकत्र येऊन विचारमंथन केले. 

या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सहायक पोलिस निरीक्षक मिरा देशमुख यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, माजी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष महेमूद शेख, माजी नगरसेवक सादिक मेंबर, गयास शेख, नितीन पाटील, दिलीप कांबळे, डी. डी. वाणी, अशोक गायकवाड, अयुब खान यांच्यासह दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि शांतता समितीतील हिंदू-मुस्लिम सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्वधर्मीय बांधवानी सर्वानुमते रावेर शहरात शांतता आणि एकता अतुट अबाधित ठेवण्याची ग्वाही दिली. उत्सव काळात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे मंडळाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. पोलिस पाटील यांचाही या बैठकीला सक्रिय सहभाग होता. बैठकीचे सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन यांनी केले, उपनिरीक्षक तुषार पाटील गोपनीय शाखेचे विशाल पाटील यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

No comments