" लाजरी , गोजरी , अशी मी साजरी मी आदिवासी पोर ह्या जंगलाची परी " कवी महेमुद तडवी यांची तडवी भिलोरी भाषेत कविता सादरीकरण रावेर प...
" लाजरी , गोजरी , अशी मी साजरी मी आदिवासी पोर ह्या जंगलाची परी "
कवी महेमुद तडवी यांची तडवी भिलोरी भाषेत कविता सादरीकरण
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सहस्त्रलिंग येथे परिवर्तनाच्या वाटेवर या उपक्रमा अंतर्गत दहावे वाटसरू श्री महेमुद तडवी ( कवी ) यांची भेट व कविता सादरीकरण..
सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले नंतर श्री महेमुद तडवी यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री विकास सुरवाडे सरांनी केले. श्री महेमुद तडवी यांनी ग्रामीण जीवन , शिक्षण आदिवासी संस्कृती वर आधारीत आदिवासी तडवी बोलीभाषेतील कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या .
" लाजरी , गोजरी , अशी मी साजरी
मी आदिवासी पोर ह्या जंगलाची परी "
या कवितेच्या माध्यमातून मुलींमध्ये एक आगळा वेगळा उत्साह निर्माण केला व विद्यार्थ्यांनीही कवितेला यथोचित प्रतिसाद दिला .
" माहि भाषा मुळ माल हा मंच मियला ,
जडी- तडी माह्या असा सन्मान होला "
या शब्दांमधुन बोलीभाषेचे महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. श्री महेमुद तडवी यांनी " परिवर्तनाच्या वाटेवर " या उपक्रमाचे कौतुक केले व सहस्त्रलिंगच्या विद्यार्थ्यांना मी कवितेच्या माध्यमातून काही तरी देण्यासाठी आलो आहे परंतू जातांना या विद्यार्थ्यांपासून काही तरी नक्की घेऊन जाणार आहे, शिकुन जाणार आहे असे प्रतिपादन केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कविता हा साहीत्य प्रकार जवळून अनुभवता आला व त्यांचे शब्दविश्व समृद्ध होण्यास मदत झाली .
खरं तर रावेर तालुक्याला एक आगळे वेगळे भाषा वैविध्य लाभले आहे तालुक्यात मराठी, उर्दू या भाषांसोबत तडवी भिलोरी, पावरा, बंजारा, लेवा गणबोली, गुर्जरी बोली , तावडी, अहिराणी इत्यादी बोलीभाषा बोलल्या जातात. व आपल्या तालुक्यात नोकरी निमित्त जे सहकारी शिक्षक इतर जिल्हा व तालुक्यातून रावेर तालुक्यात कार्यरत आहेत त्यांच्या भाषा-बोलीभाषा ( वऱ्हाडी, बावची, दखनी मराठी कदाचित माझ्या माहितीच्या बाहेर अजून इतर बोलीभाषा बोलणारे बांधवही असतील )..... आपलं भाषाविश्व व भाषासौंदर्य समृद्ध करत आहेत आपण सर्व भाषा-बोली भाषांचा आदर केला पाहिजे या माध्यमातून हा विचार मांडावासा वाटला. या आठवड्याचा " साप्ताहीक अभ्यास विजेता " म्हणून युवराज संतिराम बडोले इ २ री यांस श्री महेमुद तडवी यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साईनाथ चन्ने सरांनी केले व आभार श्रीमती नमिरा तडवी मॅडमांनी मानले . कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री युनूस तडवी, सदस्य श्री आसिफ तडवी, वहाब तडवी उपस्थित होते.


No comments