adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तहसील व कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या सामंजस्य करारांतर्गत "सेवा पंधरवडा" संदर्भात मार्गदर्शन ..

 यावल तहसील व कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या सामंजस्य करारांतर्गत "सेवा पंधरवडा" संदर्भात मार्गदर्शन ..  भरत कोळी यावल ता.प्रतिनि...

 यावल तहसील व कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या सामंजस्य करारांतर्गत "सेवा पंधरवडा" संदर्भात मार्गदर्शन .. 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा. श्री.नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस आणि  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दरम्यान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान होऊ घातलेल्या "सेवा पंधरवडा "  संदर्भात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल तसेच तहसील कार्यालय  यावल यांच्या सामंजस्य करारानुसार मा. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली, निवासी नायब तहसिलदार मा. श्री. बी.एम.पवार यांच्या उपस्थितीत "सेवा पंधरवडा" दरम्यान घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी आढावा बैठक घेऊन  मार्गदर्शन केले. या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार मा. श्री. बी.एम.पवार यांनी विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, केंद्र शासनाचा जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलीयर सर्टिफिकेट यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच वरील सर्व कागदपत्रे काढतांना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच "सेवा पंधरवडा" दरम्यान यावल तहसील कार्यालयातून विद्यार्थ्यांना वरील कागदपत्रे काढण्यासाठी  सर्वोतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक प्रा. आर.एस. तडवी यांनी, सुत्रसंचालन प्रा. सोनाली पाटील  यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. निकिता पाटील यांनी केले या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य डॉ. हेमंत भंगाळे, प्रा‌. मनोज पाटील, प्रा. संजय कदम, प्रा. संदिप मोरे, प्रा. नरेंद्र गवळे, प्रा. आर.एस. थिगळे, एम ओ समन्वयक प्रा. पंकज महाजन, प्रा. वैशाली कोष्टी, प्रा. रत्नाकर कोळी आणि सेतू संचालक स्नेहल फिरके यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते..

No comments