मा. समाजसेविका सौ. सुमन गजानन देसाई यांना परम पूज्य साने गुरुजी समाज भूषण पुरस्कार प्रदान वसई-विरार प्रतिनिधी मनिषा जाधव (संपादक -:- हेमक...
मा. समाजसेविका सौ. सुमन गजानन देसाई यांना परम पूज्य साने गुरुजी समाज भूषण पुरस्कार प्रदान
वसई-विरार प्रतिनिधी मनिषा जाधव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक ७ सप्टेंबर २०२५ (रविवार) रोजी कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने, शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत परम पूज्य सानेगुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हया भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री सुप्रसिद्ध जागतिक सुलेखनकार मा. श्री अच्युत पालव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ दिवाकर तायडे(पद्मश्री पुरस्कार भारत सरकार), कॅप्टन मनोज भामरे(माजी लष्करी अधिकारी भारतीय लष्कर).
श्री. रामप्रसाद (जितू) महादेव गुप्ता, राष्ट्रीय उपाध्यक्ष, ऑल इंडिया अँटी पायरसी सेल, मुंबई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. समाजसेविका सौ. सुमन देसाई यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हा बहुमान त्यांना प्राप्त झाला आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे समस्त कडगावकर ग्रामस्थांनी सुमन देसाई यांना पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद दिले.

No comments