adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घरकुल योजनेच्या तिसर्‍या हप्त्याचे धनादेश वितरण

 घरकुल योजनेच्या तिसर्‍या हप्त्याचे धनादेश वितरण   अमोल बावस्कार बुलढाणा संपादक हेमकांत गायकवाड  मलकापूर :- प्रत्येकाचे स्वत:चे हक्काचे घर अ...

 घरकुल योजनेच्या तिसर्‍या हप्त्याचे धनादेश वितरण  


अमोल बावस्कार बुलढाणा

संपादक हेमकांत गायकवाड 

मलकापूर :- प्रत्येकाचे स्वत:चे हक्काचे घर असावे या हेतूने शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना राबविली जात आहे. मलकापूर शहरात नगर परिषदेमार्फत शहरातील अशा पात्र लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला असून त्यांचा या घरकुल योजनेच्या तिसर्‍या हप्त्याचे धनादेश वितरण ३१ ऑगस्ट रोजी माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू व समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे ३१ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांची त्यांच्या निवासस्थानी जावून सदिच्छापर भेट घेतली. यावेळी भाई अशांत वानखेडे यांच्या माध्यमातून रमाई घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या तिसर्‍या हप्त्याचे प्रत्येकी ५० हजार रूपये असे धनादेशाचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जंजाळ, बुलढाणा संपर्क प्रमुख गजानन लोखंडकर, जिल्हा उपप्रमुख अजय टप, दिलीपभाऊ इंगळे, दिपक मेश्राम, डॉ.अशोक सुरडकर, इम्रान बॉस व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments